Home /News /maharashtra /

VIDEO: अतिवृष्टीने झालेलं नुकसान पाहून खासदार नवनीत राणांना अश्रू अनावर

VIDEO: अतिवृष्टीने झालेलं नुकसान पाहून खासदार नवनीत राणांना अश्रू अनावर

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी आज नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. यावेळी त्यांना रडू कोसळलं.

अमरावती, 25 जुलै: मागील तीन दिवसांपासून पावसाची संततधार अमरावती जिल्ह्यात (Rainfall in Amravati) सुरु आहे. काही ठिकाणी अतिवृष्टीमुळे पूर स्थिती निर्माण झाल्याने शेतीसह अनेक घराचं देखील नुकसान (Heavy rainfall damages crops) झालं आहे. नदी-नाले तुडुंब भरून वाहत आहेत. विदर्भात उद्भवलेल्या या परिस्थितीनंतर लोकसभेच कामकाज आटोपून अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (MP Navneet Rana) थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहचल्या. पाऊस सुरू असताना त्यांनी खार तळेगाव, टाकरखेडा, रामा साहुर, शिराळा येथे झालेल्या नुकसानग्रस्त भागाची चिखलात जाऊन पाहणी केली. यावेळी नवनीत राणा यांनी चिखलातुन पुराच्या पाण्यातून वाट काढत लोकांच्या समस्या जाणून घेतल्या. जिल्ह्यातील अनेकांच्या घराची पावसाने पडझड झाल्याने त्याच्यावर उपासमारीची वेळ आहे. ही परिस्थिती बघताना खासदार नवनीत राणाचे अश्रू अनावर झाले. उपमुख्यमंत्री काय तुमची वसुली करायला झालो नाही, अजितदादांनी कार्यकर्त्यांना बजावले, VIDEO मुख्यमंत्र्यांना टोला खासदार नवनीत राणा यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. गाडी चालवत पंढरपूरला जाणारे मुख्यमंत्री ठाकरे यांनी विदर्भाची पावसाने झालेली परिस्थिती पहावी. तसेच स्वतः गाडी ड्रायव्हिंग करत विदर्भातील नागरिकांच्या आणि शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घ्याव्यात. जोपर्यंत अमरावतीत नुकसानग्रस्त भागाची पाहणी करणार नाहीत तोपर्यंत तुम्हाला कळणार कसं? मदत कशी दिली जाणार असा प्रश्न थेट खासदार नवनीत राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विचारला आहे.
Published by:Sunil Desale
First published:

Tags: Amravati, Maharashtra, Mumbai, Navneet Rana, Rain, Rain flood, अमरावतीamravati, महाराष्ट्र amravati

पुढील बातम्या