अमरावती, 6 ऑगस्ट: अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Navneet rana)यांच्यासह त्याचं अख्ख कुटुंब कोरोनाच्या विळख्यात सापडलं आहे. धक्कादायक म्हणजे आता खासदार नवनीत राणा यांचे पती आमदार रवी राणा (Ravi rana) यांचा रिपोर्ट देखील पॉझिटिव्ह आला आहे.
राणा कुटुंबातील 12 सदस्यांना कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे. या सदस्यांमध्ये नवनीत राणांच्या मुले आणि सासू-सासऱ्यांचाही समावेश आहे. नवनीत राणा यांचेही रिपोर्ट सकाळी पॉझिटिव्ह आला होता, तर रवी राणा यांचा रिपोर्टही पॉझिटिव्ह आल्यानं राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
हेही वाचा...भावाला पैसे आणण्यासाठी घरी पाठवून अल्पवयीन रुग्ण मुलीवर डॉक्टरचा अत्याचार
गेल्या काही दिवसांत संपर्कात आलेल्या लोकांनी कोरोना चाचणी करून घ्यावी, असं आवाहन खासदार नवनीत राणा यांनी केलं आहे.
रवी राणा आई-वडिलांच्या सेवेत...
मिळालेली माहिती अशी की, आमदार रवी राणा हे नागपूरला त्यांच्या आई-वडिलांच्या सेवेत आहेत. अशात नवनीत आणि रवी राणा यांच्या मुलगा आणि मुलीची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. याशिवाय नवनीत राणा यांचे सासू-सासरे म्हणजे रवी राणा यांचे आई-वडील नागपूरच्या व्होकहार्ट रुग्णालयात दाखल आहेत. त्यात आता आमदार रवी राणा यांचाही कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आली आहे.
दरम्यान, दोन दिवसांपूर्वी आमदार रवी राणा यांचे वडील आणि खासदार नवनीत राणा यांचे सासरे गंगाधर राणा यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. या पार्श्वभूमीवर राणा यांच्या कुटुंबातील सर्व सदस्य आणि कार्यकर्ते अशा जवळपास 50 ते 60 जणांची कोरोना चाचणी घेण्यात आली. या चाचणीत राणा कुटुंबातील सर्व सदस्यांना कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याचं स्पष्ट झालं आहे. यामध्ये आमदार-खासदार पती-पत्नींच्या मुलांचा समावेश आहे. या पार्श्वभूमीवर आमदार रवी राणा यांच्या घराचा संपूर्ण परिसर सॅनिटाईज करण्यात आलं आहे.
हेही वाचा... Plasma Therapy ने पदरी निराशाच पाडली; AIIMS ने दिली महत्त्वाची माहिती
चुकीच्या सँपलमुळे घोळ
या आधी रवी राणा आणि नवनीत राणा यांचीही कोरोना चाचणी घेण्यात आली होती. मात्र, राणा दाम्पत्यांचं चुकीचे थ्रोट सॅम्पल घेतल्याने मोठा गोंधळ उडाला होता. अमरावती जिल्हा प्रशासन आरोग्य विभागाच्या हलगर्जीपणाबाबत आमदार रवी राणा यांनी थेट राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचेकडे तक्रार केली होती.