Home /News /maharashtra /

अमरावतीत राजकारण तापलं, युवा स्वाभिमान पक्षाचा मोर्चा पालिकेवर धडकला; शेकडो महिला बांगड्या घेऊन दाखल

अमरावतीत राजकारण तापलं, युवा स्वाभिमान पक्षाचा मोर्चा पालिकेवर धडकला; शेकडो महिला बांगड्या घेऊन दाखल

अमरावतीत (Amravati) छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj) पुतळ्यावरून राजकारण तापलं आहे. आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाचा मोर्चा अमरावती महानगरपालिकावर (Amravati Municipal Corporation) धडकला.

अमरावती, 17 जानेवारी: अमरावतीत (Amravati) छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj) पुतळ्यावरून राजकारण तापलं आहे. आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाचा मोर्चा अमरावती महानगरपालिकावर (Amravati Municipal Corporation) धडकला. शेकडो महिला बांगड्या घेऊन मनपावर दाखल झाल्यात. कार्यकर्ते महानगरपालिका विरोधात जोरदार घोषणाबाजी करताहेत. मनपाच्या गेट जवळ पोलिसांनी मोर्चाला अडवला. पोलीस आणि आंदोलनकर्त्यामध्ये जोरदार बाचाबाची झाली आहे. आंदोलनकर्त्यांनी महानगरपालिकासमोर बांगळ्या फेकल्या. युवा स्वाभिमान पक्षाच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. अमरावती महानगरपालिकामध्ये आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमानचे तीन नगरसेवक दाखल झाले आहेत. आशिष गावंडे, सपना ठाकूर आणि सुमती ढोके हे तीन नगरसेवक राजीनामा देणार आहेत. महापालिके समोर पोलीसांचा तगडा बंदोबस्त अमरावतीत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा महानगरपालिका आणि पोलीसांनी काल हटवला. त्यावरून राजकारण चांगलेच तापले आहे. आज आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पार्टीचे तीन नगरसेवक राजीनामे देणार आहे. त्यामुळे राजीनामे देताना गोंधळ होऊ नये यासाठी पोलिसांनी महानगरपालिका परिसरात पोलिसांनी मोठा बंदोबस्त लावला आहे. Video..!आज पिंपरीत शरद पवारांची मेट्रो सफर दरम्यान लहुजी शक्तिसेनेनं शनिवारी मध्यरात्री अमरावतीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोरून जाणान्या मार्गावरील दुभाजकाच्या अगदी समोर असलेल्या एका प्रतिकृतीजवळ साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा बसविला होता. प्रशासनाला याची माहिती मिळताच तो पुतळा काही तासातच पहाटे काढून टाकण्यात आला. या कारवाईमुळे कार्यकर्ते चांगलेच संतापले आहे. या घटनेच्या निषेधार्थ आज ते महापालिकेबाहेर निदर्शन करणार आहेत. शिवसेनेनं बसवलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवला अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर (Daryapur) येथील छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांचा पुतळा हटवण्यात आला आहे. मध्यरात्री दोन वाजताच्या सुमारास दर्यापूर पोलीस आणि नगरपालिका प्रशासनानं ही कारवाई केली आहे. रविवारच्या रात्री शिवसेनेने शिवाजी महाराज यांचा पुतळा बसवला होता. दर्यापूर येथीलही पुतळा अनधिकृत असल्यानं शिवाजी महाराजांचा पुतळा हटवला आहे. यानंतर दर्यापूर येथे पोलिसांचा मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
Published by:Pooja Vichare
First published:

Tags: Amravati, Ravi rana

पुढील बातम्या