अमरावतीत अल्पवयीन मुलीचे अपहरण करून हत्या, बलात्काराचा संशय

अमरावतीत अल्पवयीन मुलीचे अपहरण करून हत्या, बलात्काराचा संशय

अज्ञात आरोपीविरुद्ध पोलिसांनी ३०२ अन्वये गुन्हे दाखल करून आरोपीचा शोध घेतला जात आहे.

  • Share this:

अमरावती, 23 एप्रिल :  अमरावती जिल्ह्यातील परतवाडा जवळ असणाऱ्या खांझमानगर इथं राहणाऱ्या अल्पवयीन १५ वर्षीय मुलीचं अपहरण करून तिचा खून करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे.

खांजमा नगर येथे राहणाऱ्या पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलगी  परिवारातील व्यक्तीच्या वरातीचा जेवनाकरिता १७ एप्रिलला  ११ ते ११:३० दरम्यान आपल्या आई आणि वडिलांसोबत गेली होती. आई वडील जेवण करून घरी आले थोडय़ावेळाने आपली मुलगी सुद्धा परतेल या आशेने तिची ते वाट पाहत होते. मात्र मुलगी रात्री आली नाही सकाळी सुद्धा मुलगी आली नाही म्हणून चिंतातुर असणारे आई वडील तिचा शोध घेऊ लागले.

आईवडिलांनी पथ्रोट पोलीस स्टेशनमध्ये मुलगी बेपत्ता असल्याची तक्रारही दिली. मात्र याचा काहीच फायदा झाला नाही. अखेर काल 22 एप्रिल रोजी दुपारी २ ते ३ दरम्यान तिचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याची माहिती पोलिसांना लागली.

खांजमा नगर ते हरम रस्त्यावरील नदीजवळ गवतांमध्ये तिचा मृतदेह पोलिसांना आढळून आला. पोलिसांनी घटनास्थळी पोहचून मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी डॉक्टरांना सोपवण्यात आला. पोलिसांनी यावेळी अज्ञात आरोपीविरुद्ध ३०२, अन्वये गुन्हा दाखल केलेला आहे तर आरोपीचा पथ्रोट पोलीस कसून शोध घेत आहेत. घटनेची माहिती वाऱ्यासारखी संपूर्ण तालुक्यामध्ये पसरली संपूर्ण तालुक्यामध्ये घडलेल्या घटनेविषयी चीड आणि हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. अज्ञात आरोपीविरुद्ध पोलिसांनी  ३०२ अन्वये गुन्हे दाखल करून आरोपीचा शोध घेतला जात आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 23, 2018 09:39 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading