Home /News /maharashtra /

अमरावती : महापौरांच्या गाडीला अपघात, थोडक्यात बचावले

अमरावती : महापौरांच्या गाडीला अपघात, थोडक्यात बचावले

या अपघातात महापौर चेतन गावंडे थोडक्यात बचावले.

अमरावती, 29 सप्टेंबर : अमरावतीचे महापौर चेतन गावंडे यांच्या गाडीला अपघात झाला आहे. या अपघातात महापौर चेतन गावंडे थोडक्यात बचावले. रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. नागपूरवरून अमरावतीच्या दिशेने जाणाऱ्या मोठ्या ट्रकने चेतन गावंडे यांच्या वाहनाला धडक दिली. त्यामुळे वाहनाचे किरकोळ नुकसान झाले असून अपघातात कुठलीही जीवितहानी झाली नाही. तिवसा शहरातील पेट्रोल पंप चौक या परिसरात अपघात झाला असून याठिकाणी अनेकदा दुचाकी व मोठ्या वाहनाचे अपघात होत असतात. काल रात्री 9:30 वाजता महापौर गावंडे नागपूरवरून अमरावती जात असताना त्यांनी तिवसा शहराच्या पेट्रोल पंप चौकात आपले शासकीय वाहन उभे केले होते. त्याचवेळी नागपूरवरून येणाऱ्या एम एच 32 केयू. 5259 क्रमांकाच्या ट्रकने त्यांच्या वाहनाला जबर धडक दिली. यामध्ये महापौर गावंडे यांच्या वाहनाचे किरकोळ नुकसान झालं आहे. ट्रक चालकाच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली असून महापौर यांच्यासह वाहन चालक सुखरूप आहे.
Published by:Akshay Shitole
First published:

Tags: Amravati

पुढील बातम्या