मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

अमरावतीत कोरोना टेस्टसाठी तरुणीच्या गुप्तांगाचा स्वॅब घेतल्याचे प्रकरण, आरोपी लॅब टेक्निशियनला 10 वर्षांची शिक्षा

अमरावतीत कोरोना टेस्टसाठी तरुणीच्या गुप्तांगाचा स्वॅब घेतल्याचे प्रकरण, आरोपी लॅब टेक्निशियनला 10 वर्षांची शिक्षा

प्रातिनिधिक फोटो

प्रातिनिधिक फोटो

Amravati crime: कोरोनाच्या टेस्टसाठी एका लॅब टेक्निशियनने तरुणीच्या गुप्तांगाचा स्वॅब घेतल्याचा प्रकार अमरावतीत घडला होता. या प्रकरणात आरोपी लॅब टेक्निशियनला अटक करण्यात आली होती. आता या आरोपीला न्यायालयाने 10 वर्षे कारावासाची शिक्षा सुनावली आहे.

पुढे वाचा ...
अमरावती, 3 फेब्रुवारी: कोरोना आला आणि चाचणीसाठी संपूर्ण राज्यभरात टेस्टिंग सुरू झालं. मात्र, अमरावती जिल्ह्यात (Amravati) एक वेगळाच प्रकार घडला. कोरोना टेस्टसाठी (Covid test) लॅब टेक्निशियनने चक्क तरुणीच्या गुप्तांगातून स्वॅब (Swab test from woman private part) घेतल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. या घटनेने संपूर्ण देशात एकच खळबळ उडाली. या प्रकरणात आरोपी लॅब टेक्निशियनला न्यायालयाने 10 वर्षे कारावासाची शिक्षा सुनावली आहे. संपूर्ण राज्यात खळबळ उडवून देणारी घटना अमरावती शहरात 28 जुलै 2022 रोजी घडली होती. अमरावती जिल्ह्यातील बडनेरा येथील मोदी हॉस्पिटलमध्ये एका युवतीची कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आल्याचे सांगून परत एकदा युवतीच्या गुप्तांगातून (योनी)द्वारे स्वाब घेण्यात आला होता. त्यामुळे मोदी हॉस्पिटलचा लॅब टेक्निशियन अलकेश अशोक देशमुख या आरोपी विरोधात बडनेरा पोलिसांनी बलात्कार आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणात जिल्हा सत्र न्यायालयाने 12 साक्षीदारांचा जबाब घेतला. यानंतर जिल्हा न्यायालयाने 15 महिन्यांनंतर निकाल देत आरोपी अलंकेश देशमुख याला 10 वर्षे सक्षम कारावास आणि 10 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. सरकारी पक्षाच्या वतीने सरकारी वकील सुनील देशमुख यांनी प्रभावी बाजू मांडली. वाचा : 2 हजार वर्षांपासून जमिनीत गाडलं गेलेलं धक्कादायक रहस्य; खोदकामामुळे झाला खुलासा बडनेरा येथील मोदी हॉस्पिटलमध्ये या तरुणीचा विनयभंग झाल्यानंतर अमरावतीसह संपूर्ण राज्यातून संताप व्यक्त करण्यात आला होता. विरोधी पक्ष असलेल्या भाजपने सुद्धा आक्रमक पवित्रा घेतला होता. भाजपच्या वतीने आरोपीवर तातडीने कारवाई आणि शिक्षा व्हावी यासाठी आंदोलन करण्यात आले होते. या निकालावर भाजपने समाधान व्यक्त केले आहे. अमरावती शहरातील एका मॉलमध्ये एक कर्मचारी पॉझिटिव्ह आढळल्याने संपूर्ण मॉलमधील कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. बडनेरा येथील ट्रामा केअर सेंटरमध्ये चाचणी करण्यात आली. सर्व कर्मचाऱ्यांची चाचणी झाल्यानंतर कोरोना सेंटरमध्ये कुणी नसल्याचा फायदा घेत अल्केश देशमुख या लॅब टेक्निशियन याने सदर युवतीला तुझा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव आला असल्याने गुप्तांगातूनही स्वॅब घ्यावा लागणार असे सांगून गुप्तांगातून स्वॅब घेतला. ही घटना 28 जुलै 2020 रोजीची आहे. वाचा : 2 हजारांच्या नादात गमावले 9 लाख, चोरट्यांनी पळवली पैशांची बॅग,घटना CCTVमध्ये कैद घरी आल्यानंतर सदर युवतीने ही बाब आपल्या कुटुंबियांना सांगितली. त्यानंतर अमरावती येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात चौकशी केली असता गुप्तांगातून स्वॅब घेतला जात नसल्याचे समजले. अलकेश देशमुख याने आपली फसवणूक केल्याचे लक्षात आल्याने अलकेश देशमुख विरोधात 28 जुलै 2020 रोजी बडनेरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. यानंतर अमरावती शहरात चांगलीच खळबळ उडाली होती. या प्रकरणाचा खटला अमरावती येथील दुसरे जिल्हा व सत्र न्यायाधीश गायकी यांच्या न्यायालयात चालविण्यात आला. अतिरिक्त शासकीय अभियोक्ता सुनील देशमुख यांनी सरकार पक्षाच्या वतीने प्रभावीपणे बाजू मांडत या प्रकरणात एकूण बारा साक्षीदार तपासले. सरकार आणि आरोपी पक्षाची बाजू ऐकून येथील जिल्हा व सत्र न्यायालय क्रमांक दोन यांनी अल्केश देशमुख या आरोपीला कलम 376 (1) मध्ये दहा वर्षाची सश्रम कारावासाची शिक्षा आणि दहा हजार रुपये दंड ठोठावला. तर कलम 354, विनयभंगप्रकरणी पाच वर्षाचा सश्रम कारावास आणि पाच हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. न्यायालयाने केवळ 17 महिन्याच्या आत खटला चालवून आरोपीला शिक्षा ठोठावल्याने समाधान व्यक्त करण्यात आले आहे.
First published:

Tags: Amravati, Corona, Covid centre, Covid-19, Crime, Crime news, Shocking news

पुढील बातम्या