लग्नानंतर 24 वर्षीय तरुणीची हत्या, नवरा आता शेवटच्या श्वासापर्यंत तुरुंगात सडणार

लग्नानंतर 24 वर्षीय तरुणीची हत्या, नवरा आता शेवटच्या श्वासापर्यंत तुरुंगात सडणार

शाब्दिक चकमक झाल्यानंतर राहुल याने आपल्या बॅगमधून चाकू काढून प्रतीक्षावर चाकूने 6 ठिकाणी सपासप वार केले.

  • Share this:

अमरावती, 20 जानेवारी : अमरावती शहरात भरदिवसा एकतर्फी प्रेमातून 24 वर्षीय युवतीची हत्या करणाऱ्या पतीला न्यायालयाने आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. प्रतीक्षा मेहेत्रे ही दिनांक 23 नोव्हेंबर 2017 रोजी साई नगर परिसरातील ओंकार मंदिर परिसरातून मैत्रिणी सोबत दुचाकीवर परत येत असताना दुपारच्या सुमारास राहुल भड याने या दोघींना अडवलं. काही वेळ शाब्दिक चकमक झाल्यानंतर राहुल याने आपल्या बॅगमधून चाकू काढून प्रतीक्षावर चाकूने 6 ठिकाणी सपासप वार केले. यात प्रतीक्षा हिचा रुग्णालयात नेत असतानाच मृत्यू झाला.

प्रतीक्षावर चाकूने वार करुन राहुल भड घटनास्थळावरून पसार झाला होता. आरोपी राहुल भड (32) याला पोलिसांनी 24 नोव्हेंबर 2017 रोजी रात्री मूर्तीजापूर येथून अटक केली. प्रतीक्षाच्या हत्येनंतर राहुलने विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याचेही तपासात पुढे आलं. राहुल याने प्रतीक्षा सोबत आपला विवाह झाला होता. परंतु त्यानंतर झालेल्या वादामुळे ती आपल्यासोबत राहत नसल्याने राहुलने त्याचा राग धरून प्रतीक्षाला जीवे मारण्याचा कट रचला होता.

प्रतीक्षा हिने राजापेठ पोलीस ठाण्यात राहुल पासून आपल्या जीवाला धोका असल्याच्या तक्रारी सुद्धा दाखल केल्या होत्या. या संपूर्ण प्रकरणाची सुनावणी अमरावती येथील प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश उर्मिला जोशी फाळके यांच्या न्यायालयात झाली. फिर्यादीच्या वतीने येथील प्रमुख जिल्हा सरकारी वकील परीक्षित गणोरकर यांनी प्रभावीपणे युक्तिवाद केला. संपूर्ण प्रकरणात एकूण सहा साक्षीदार प्रमुख जिल्हा सरकारी वकील परिक्षीत गणोरकर यांनी तपासले व सहाही साक्षीदार आपल्या जबाबावर कायम राहिल्याने दोष सिद्ध करू शकलो अशी प्रतिक्रिया जिल्हा सरकारी वकील परिक्षीत गणोरकर यांनी दिली.

या संपूर्ण प्रकरणात प्रतीक्षासोबत असलेल्या तिच्या मैत्रिणीची साक्ष ही महत्त्वाची ठरली.

सरकारी पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरत प्रमुख जिल्हा सत्र न्यायाधीश उर्मिला जोशी फाळके यांनी आरोपीला आजन्म कारावासाची व 5 हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. तसंच कलम 357 अन्वये फिर्यादीच्या कुटुंबाला मदत देण्याचा आदेश सुद्धा न्यायालयाने दिलेला आहे.

Published by: Akshay Shitole
First published: January 20, 2021, 7:01 PM IST

ताज्या बातम्या