अमरावती हत्याकांडात धक्कादायक खुलासा, 'या' कारणामुळे प्रेयसीचा भररस्त्यात गळा चिरला

अमरावती हत्याकांडात धक्कादायक खुलासा, 'या' कारणामुळे प्रेयसीचा भररस्त्यात गळा चिरला

तरुणीची तिच्या प्रियकराने हत्या केल्याची घटना मंगळवारी घडली. या हत्याप्रकरणात आता नवा खुलासा झाला आहे.

  • Share this:

अमरावती, 10 जुलै : अमरावती जिल्ह्यातील कवठा बहाळे इथं अर्पिता ठाकरे या तरुणीची तिच्या प्रियकराने हत्या केल्याची घटना मंगळवारी घडली. या हत्याप्रकरणात आता नवा खुलासा झाला आहे. अर्पिताच्या कुटुंबीयांचा प्रेमविवाहाला विरोध असल्यानेच तिच्या प्रियकराने तिची हत्या केल्याची माहिती समोर आली आहे.

अर्पिता ठाकरे आणि मलकापूर पांढरी इथं राहणाऱ्या तुषार मस्करे यांच्या प्रेमप्रकरणाला अर्पिताच्या कुटुंबीयांचा विरोध होता. यामुळे प्रियकर तुषारने तिची गळा चिरून निर्घृन हत्या केली. एवढेच नाही, तर त्याने तिच्यावर चाकूचे तब्बल 18 वार केले. ही घटना अमरावतीतील चुनाभट्टी ते मुधोळकरपेठ परिसरात घडली. या घटनेनंतर परिसरातील युवकांनी तुषारला चोप देऊन पोलिसांच्या स्वाधीन केले.

मुधोळकरपेठ परिसरात मंगळवारी दुपारी 2.45 वाजण्याच्या सुमारास मैत्रिणीसोबत शिकवणीवरून परत येणाऱ्या अर्पितावर तुषारने चाकूने वार केला. मुधोळकरपेठ परिसरातील युवक तुषारला रोखण्यासाठी धावेपर्यंत त्याने अर्पिताच्या अंगावर चाकूने 18 वार केले होते. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अर्पिताला सागर बीजवे या युवकाने उचलून जिल्हा सामान्य रुग्णालयात नेले तर काही युवकांनी तुषारला पकडून त्याला चांगला चोप देऊन राजापेठ पोलिसांच्या स्वाधीन केले. 

गेल्या तीन वर्षांपासून तुषार मस्करे आणि अर्पिता ठाकरे यांचे प्रेमप्रकरण सुरू होते. त्यांच्या प्रेमप्रकारणाला अर्पिताच्या घरच्यांचा विरोध होता. अर्पिता अल्पवयीन असल्याने ते दोघे लग्नही करू शकत नव्हते. अर्पिताच्या घरच्यांचा विरोध वाढला असताना तुषारने आज चक्क आपल्या प्रेयसीचीच हत्या केली, अशी माहिती पोलीस उपयुक्त शशिकांत सातव यांनी दिली आहे. घटनेमुळे शहरात खळबळ उडाली असून युवतींच्या सुरक्षिततेबाबतचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे.

SPECIAL REPORT: काय आहे सलमान-कतरिनाच्या लग्नाचं सत्य?

First published: July 10, 2019, 12:47 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading