Home /News /maharashtra /

अमरावती जिल्हा बँक निवडणूक: अटीतटीच्या लढतीत राज्यमंत्री बच्चू कडू यांनी मारली बाजी, तीन मतांनी विजय

अमरावती जिल्हा बँक निवडणूक: अटीतटीच्या लढतीत राज्यमंत्री बच्चू कडू यांनी मारली बाजी, तीन मतांनी विजय

Bacchu Kadu won Amravati district bank election: अमरावती जिल्हा बँक निवडणुकीत राज्यमंत्री बच्चू कडू यांचा विजय झाला आहे.

अमरावती, 5 ऑक्टोबर : अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (एडीसीसी) (Amravati District Central Co operative Bank) संचालक मंडळाची निवडणूक 4 ऑक्टोबर रोजी झाली. या निवडणुकीचा आज निकाल जाहीर होत आहे. या निवडणुकीत राज्यमंत्री बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी विजय मिळवला आहे. अटीतटीच्या निवडणुकीत बच्चू कडू यांनी विजय मिळवत माजी अध्यक्ष बबलू देशमुख (Babalu Deshmukh) यांचा पराभव केला आहे. चांदुर बाजार सेवा सहकारी सोसायटीतून परिवर्तनचे राज्यमंत्री राज्यमंत्री बच्चू कडू यांनी विजय मिळवला आहे. अटीतटीच्या निवडणुकीत बच्चू कडू यांनी माजी अध्यक्ष बबलू देशमुख यांचा पराभव केला आहे. राज्यमंत्री बच्चू कडू यांना 22 मते मिळाली तर बबलू देशमुख यांना 19 मते मिळाली आणि बच्चू कडू यांनी तीन मतांनी विजय मिळवला आहे. अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीचा निकाल सहकार पॅनलचे उमेदवार आणि माजी आमदार वीरेंद्र जगताप, श्रीकांत गावंडे, सुधाकर भरसाकले यांचा विजय सहकार पॅनलच्या विरेंद्र जगताप यांना 21 मते परिवर्तन पॅनलच्या किशोर कडू यांना 9 मते धामणगाव रेल्वे सेवा सोसायटीमधून सहकार पॅनलच्या श्रीकांत गावंडे यांचा 21 मते घेऊन विजयी, प्रतिस्पर्धी सुनील सिसोदे यांना केवळ 11 मते मिळाली भाजप आमदाराचा पराभव दर्यापूर सेवा सहकारी सोसायटीतून परिवर्तन पॅनलचे विद्यमान भाजपचे आमदार प्रकाश भारसाकळे यांचा पराभव सहकार सहकार पॅनेलचे सुधाकर भारसाकळे 48 मते घेऊन विजयी तर आ प्रकाश भारसाकळे यांना 20 मते सहकार पॅनलचे 8 उमेदवार विजयी वीरेंद्र जगताप चांदूर रेल्वे श्रीकांत गावंडे धामणगाव सुरेश साबळे तिवसा सुधाकर भारसाकडे दर्यापूर हरिभाऊ मोहोड भातकुली सुनील वऱ्हाडे अमरावती दयाराम काळे चिखलदरा प्रकाश काळबांडे सहकारी पतसंस्था परिवर्तन पॅनलचे विजयी उमेदवार राज्यमंत्री बच्चू कडू चांदूरबाजार चित्रा डहाने मोर्शी अजय मेहकरे अंजनगाव सूर्जी जयप्रकाश पटेल धारणी अपक्ष विजयी उमेदवार अभिजित ढेपे नांदगाव खंडेश्वर नरेशचंद्र ठाकरे वरुड आनंद काळे अचलपूर गत 11 वर्षांनंतर जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक होऊ घातली आहे. या अकरा वर्षात राजकीय घडामोडीत अनेक बदल झाल्याने सहकार क्षेत्रामधील प्रतिष्ठेची समजल्या जाणाऱ्या या निवडणुकीत यावेळी एका गटात महिला व बालकल्याण मंत्री व पालकमंत्री यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) तर दुसऱ्या गटात राज्यमंत्री बच्चू कडू यांचा समावेश आहे. याशिवाय अनेक दिग्गज निवडणुकीच्या मैदानात उतरल्याने या निवडणुकीत आणखीच रंगत वाढली होती. जिल्हा मध्यवर्ती बँकेची यापूर्वीची निवडणूक सन 2010 मध्ये झाली होती. त्यावेळी बबलू देशमुख व संजय खोडके असे दोन गट निवडणूक मैदानात होते. त्यावेळी बबलू देशमुख गटाच्या 25 पैकी 13 जागा निवडून आल्याने बँकेवर त्यांनी सत्ता प्रस्तापित केली. सन 2015 मध्ये पंचवार्षीक निवडणूक होणे अपेक्षित होते. परंतु राजकीय व्देष व अन्य कारणांमुळे तब्बल पाच वर्ष बँकेतील विविध प्रकरण न्यायप्रविष्ट झाल्याने सन 2010 पासून निवडणूकच झाली नाही. त्यामुळे तब्बल 11 वर्ष बँकेवर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बबलू देशमुख गटाचे वर्चस्व होते. त्यामुळे विरोधकांची चांगलीच गोची झाल्याने यावेळी पुन्हा सर्वच विरोधक एकत्र आले.
Published by:Sunil Desale
First published:

Tags: Amravati, Election, Yashomati thakur

पुढील बातम्या