• Home
  • »
  • News
  • »
  • maharashtra
  • »
  • ईडीचा काँग्रेस नेत्यांना दणका, अमरावती जिल्हा बँक 3.39 कोटी प्रकरणी बजावला समन्स

ईडीचा काँग्रेस नेत्यांना दणका, अमरावती जिल्हा बँक 3.39 कोटी प्रकरणी बजावला समन्स

Amravati District Central Co-operative Bank : अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील 3.39 कोटींची आर्थिक अनियमितता झाली होती.

Amravati District Central Co-operative Bank : अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील 3.39 कोटींची आर्थिक अनियमितता झाली होती.

Amravati District Central Co-operative Bank : अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील 3.39 कोटींची आर्थिक अनियमितता झाली होती.

  • Share this:
अमरावती, 17 सप्टेंबर : विदर्भातील अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत (Amravati District Central Co-operative Bank) आर्थिक अनियमितता झाल्याचं प्रकरण समोर आल्यानंतर या प्रकरणी आता ईडीने बँकेचे माजी अध्यक्ष व काँग्रेसचे (congress) अमरावती (amravati) जिल्हा अध्यक्ष अनिरुद्ध उर्फ बबलु देशमुख (bablu deshmukh) व काँग्रेसचे माजी आमदार वीरेंद्र जगताप (virendra jagatap) यांच्या पत्नी माजी अध्यक्ष उत्तरा जगताप यांना ईडीने समन्स बजावला आहे. तसंच तात्काळ ईडी (ed) कार्यालयात हजर राहण्याचे आदेश दिल्याने खळबळ उडाली आहे. अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील 3.39 कोटींची आर्थिक अनियमितता झाली होती. यानंतर ईडीने संपूर्ण व्यवहाराची माहिती मागवत असून जिल्हा उपनिबंधकाना ईडीने पत्र पाठवत मुंबई ईडी कार्यालयात बँकेचा लेखापरिषण अहवाल मागवला होता. विकेंडनंतर राज्यात जोरदार पावसाची शक्यता; या जिल्ह्यांना हवामान खात्याचा इशारा अमरावती जिल्हा बँकेने एका खासगी कंपनीत 700 कोटी रुपयांची गुंतवणूक केली, यात दलालीपोटी 3.39 कोटी रुपये देण्यात आले. ही गुंतवणूक थेट बँकेकडून झाली असताना दलाली देणे बंधनकारक नव्हते, त्यामुळे बँकेची 3.39 कोटींनी फसवणूक झाली अशी तक्रार बँकेचे प्राधिकृत अधिकारी व जिल्हा उपनिबंधक संदीप जाधव यांनी 15 जून रोजी शहर कोतवाली पोलीस ठाण्यात नोंदविली होती. सचिन वाझेनं अनिल देशमुखांच्या सचिवाकडे दिल्या होत्या पैशांनी भरलेल्या 16 बॅगा त्यामुळे अधिकारी, कर्मचारी व सहा दलाल अशा एकूण 11 जणांवर फसवणूक, गुन्हेगारी स्वरूपाचा कट रचल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. याच प्रकरणात आता ईडीने बॅंकेचे माजी अध्यक्ष बबलु देशमुख व उत्तरा जगताप यांना समन्स बजावले आहे. विना विलंब ईडी कार्यालयात हजर राहण्याच सांगितले तर पुढील महिन्यात जिल्हा बँकेची निवडणूक होत आहे, यात उमेदवारी अर्ज दाखल झाले आहे. विशेष म्हणजे, 4 ऑक्टोबर रोजी जिल्हा बँकेची निवडणूक होत असताना या ईडीच्या नोटीसने काँग्रेस पक्षाला झटका लागला आहे.
Published by:sachin Salve
First published: