मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Amravati Crime : अमरावती हादरले, त्या विद्यार्थाची आत्महत्या नव्हे तर हत्या, वार्डनला अटक

Amravati Crime : अमरावती हादरले, त्या विद्यार्थाची आत्महत्या नव्हे तर हत्या, वार्डनला अटक

अमरावती येथील विद्याभारती माध्यमिक विद्यालयात शिक्षण घेणाऱ्या मुलाची हत्या करण्यात आल्याचे उघड झाले आहे. त्याच विद्यालयातील तो वसतिगृहात राहत होता.

  अमरावती, 23 जुलै : अमरावती येथील विद्याभारती माध्यमिक विद्यालयात शिक्षण घेणाऱ्या मुलाची हत्या करण्यात आल्याचे उघड झाले आहे. त्याच विद्यालयातील तो वसतिगृहात राहत होता. आदर्श नितेश कोगे (वय 13) राहणार जामली या आदिवासी विद्यार्थ्याचा (दि. 21) जुलै रोजी वसतिगृहात मृतदेह आढळला होती. यामुळे वसतिगृह प्रशासनात एकच खळबळ उडाली. (Amravati Crime)

  मृतक आदर्श याने आपल्या वडीलांना 1 दिवस आधी कॉल केला होता. यावेळी त्याने मुझे यहा नही रहना, मुझे यहा बहुत मारते है असं सांगत कॉल कट झाला. यानंतर त्याने व्हाट्सपला मेसेज करत मला मारहाण केल्याचे सांगितले होते. त्यामुळे वसतिगृहाच्या प्रशासनावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी वडील नितेश कोगे यांनी अमरावतीच्या गाडगेनगर पोलिसांकडे एका तक्रारीतून केली.

  हे ही वाचा : 'नारायण राणेंना संपवण्यासाठी उद्धव ठाकरेंनी सुपारी दिलेली आणि आता एकनाथ शिंदे..' नितेश राणेंचा गंभीर आरोप

  आदर्शचे शवविच्छेदन अकोला येथील वैद्यकीय महाविद्यालयात इन कॅमेरा करण्यात आले यात त्याचा नाक आणि तोंड दाबल्याने गुदमरून मृत्यू झाल्याचा अहवाल प्राप्त झाले. वसतिगृहाचे वार्डन रवींद्र पांडुरंग तिखाडे यांच्यावर हत्येचा गुन्हा दाखल करून ताब्यात घेण्यात आले आहे. अशी माहिती गाडगेनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आसाराम चोरमले यांनी माहिती दिली.

  हे ही वाचा : Beed : बसस्थानकाला खड्ड्यांचा विळखा; बस चालकांसह प्रवाशांची तारेवरची कसरत, पाहा VIDEO

  आसाराम चोरमले पोलीस निरीक्षक गाडगे नगर पोलीस ठाणे यावेळी म्हणाले कि, या घटनेने वस्तीगृहातील विद्यार्थी चांगलेच घाबरले आहेत. पोलिस आयुक्त डॉ.आरती सिंह यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी विद्यालय व वसतिगृहाला भेट देऊन चौकशी केली आहे. नेमक तोंड कोणी दाबलं कोणी मारलं याचा शोध पोलीस आता घेत असल्याची माहिती गाडगे यांनी दिली आहे.

  Published by:Sandeep Shirguppe
  First published:

  Tags: Amravati, Crime news, अमरावती, अमरावतीamravati

  पुढील बातम्या