प्रेमप्रकरणातून 19 वर्षीय मुलीची हत्या, तरुणाने घरात घुसून केला धारधार शस्त्राने हल्ला

प्रेमप्रकरणातून 19 वर्षीय मुलीची हत्या, तरुणाने घरात घुसून केला धारधार शस्त्राने हल्ला

युवकाने आपल्या प्रियसीच्या गळ्यावर धारदार शस्त्राने हल्ला करत खून केला.

  • Share this:

अमरावती, 19 एप्रिल : महाराष्ट्रात गेल्या काही काळापासून प्रेमप्रकरणातून होणाऱ्या खूनांमध्ये वाढ झाली आहे. अशातच आता 19 वर्षीय मुलीची तिच्या घरात घुसून हत्या केल्याचा प्रकार अमरावतीत घडला आहे. दुपारी युवतीच्या घरी कुणीही नसल्याची संधी साधून युवकाने आपल्या प्रियसीच्या गळ्यावर धारदार शस्त्राने हल्ला करत खून केला. अमरावती जिल्ह्यातील लेहेगाव इथं ही घटना घडली आहे.

तरुणीची हत्या केल्यानंतर आरोपी युवकाने स्वतःला देखील संपवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याला जखमी अवस्थेत उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आलं आहे. प्रवीण कावनपुरे याचं 19 वर्षीय युवतीवर प्रेम होतं. यातूनच ही घटना घडली असल्याची प्राथमिक माहिती स्थानिकांकडून मिळाली आहे.

प्रेमप्रकरणातून प्रवीण आणि सदरील युवतीमध्ये वाद होत होते. हे वाद वाढले आणि त्यानंतर प्रवीणने हे टोकाचं पाऊल उचल्याचं बोललं जात आहे. या हत्येनंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाल असून याप्रकरणी अधिक तपास करण्यात येत आहे. मात्र या हत्येनंतर परिसरात चांगलीच खळबळ उडाल्याचं पाहायला मिळालं.

हेही वाचा- खेळता खेळताच थांबला आयुष्याचा प्रवास, 3 वर्षीय मुलाचा मृत्यू

लॉकडाऊनमध्येही हिंसाचार थांबेना, भिवंडीतही झाला खून

भिवंडी शहरालगतच्या कारीवली येथील तलावाजवळ एका यंत्रमाग कारखान्यातील कामगाराचा निर्घृण खून करण्यात आला आहे. अज्ञात मारेकऱ्याने पाठीमागून धारदार शस्त्राने कामगाराचा भोसकून खून केल्याची घटना शनिवारी सकाळी घडली आहे. अजित स्वयंकांत पटेल (47 रा. बालाजी नगर, कारीवली) असे हत्या झालेल्या यंत्रमाग कामगाराचे नाव आहे.

अजित पटेल हा कामगार भंडारी कंपाऊंड येथे कारखान्यात काम करीत होता. तो सकाळी कारखान्यातील लाईट बंद करण्यासाठी कारीवली तलावमार्गे रस्त्याने पायी निघाला होता. त्यावेळी त्याच्या पाठीमागून आलेल्या अज्ञात मारेकऱ्याने त्याच्या पाठीवर धारदार शस्त्राने सपासप वार केले. यात अजित पटेल याचा जागीच मृत्यू झाला, अशी माहिती पोलिस सूत्रांकडून मिळाली आहे.

संपादन - अक्षय शितोळे

First published: April 19, 2020, 4:43 PM IST

ताज्या बातम्या