VIDEO : 'मी मरता मरता वाचले,' ICU तून बाहेर आल्यानंतर नवनीत राणांनी सांगितला वेदनादायी अनुभव

VIDEO : 'मी मरता मरता वाचले,' ICU तून बाहेर आल्यानंतर नवनीत राणांनी सांगितला वेदनादायी अनुभव

नवनीत राणा यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली असून एक व्हिडिओ पोस्ट करत त्यांनी याबाबतची माहिती दिली आहे,

  • Share this:

मुंबई, 15 ऑगस्ट : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांची प्रकृती बिघडली होती. श्वसन व फुफ्फुसाचा त्रास होत असल्याने त्यांना मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. नवनीत राणा यांच्या प्रकृती खालावल्याने त्यांच्यावर ICU मध्ये उपचार सुरू होते. त्यानंतर आज त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली असून एक व्हिडिओ पोस्ट करत त्यांनी याबाबतची माहिती दिली आहे.

'आज मला ICU मधून सामान्य कक्षात स्थलांतर करण्यात आले आहे, आता माझी प्रकृती थोड़ी स्थिर आहे, आपणा सर्वांचा आशीर्वाद माझ्या सोबत आहे. मी लवकर बरी होऊन जनसेवेत पुन्हा सज्ज होणार,' असा विश्वास नवनीत राणा यांनी व्यक्त केला आहे.

नवनीत राणा यांनी आयसीयूतून बाहेर पडल्यानंतर एक व्हिडिओही शेअर केला आहे. 'आत्ताच मी लिलावती रुग्णालयाच्या आयसीयूमधून बाहेर आली आहे. अनेक लोक माझ्यासाठी चिंता करत होते, प्रार्थना करत होते. या प्रार्थनांमुळे मी मरता मरता वाचले. माझी तब्येत आता ठीक आहे. देवाने मला पुन्हा एक संधी दिली पाहिजे, अशी मी प्रार्थना करत होते. कारण मला माझ्या लोकांसाठी काम करायचं आहे. आपल्या आशीर्वादमुळे मी आज वाचले. सगळ्यांचे धन्यवाद,' असं त्यांनी या व्हिडिओतून म्हटलं आहे.

अमरावती...नागपूर ते मुंबई

नागपुरवरून रस्तामार्गे रुग्णवाहिकेने मुंबईत निघालेल्या खासदार नवनीत राणा यांना काल दुपारी 2 वाजता लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. लीलावती रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टर प्रभू देसाई व डॉक्टर जे.डी. पानकर यांच्या देखरेखेखाली उपचार सुरू होते. आमदार रवी राणा हेदेखील कोरोना बाधित असल्याने त्यांची सुद्धा आरोग्याविषयी तपासणी लीलावती रुग्णालयात करण्यात आली.

Published by: Akshay Shitole
First published: August 15, 2020, 5:43 PM IST

ताज्या बातम्या