मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /CCTV VIDEO: धुलिवंदनाच्या दिवशी मोठा राडा; 6 जणांकडून 21 वर्षीय तरुणाला बेदम मारहाण, मृत्यूशी झुंज सुरू

CCTV VIDEO: धुलिवंदनाच्या दिवशी मोठा राडा; 6 जणांकडून 21 वर्षीय तरुणाला बेदम मारहाण, मृत्यूशी झुंज सुरू

Amravati Crime News : या मारहाणीत जखमी झालेला युवक मृत्यूशी झुंज देत असून सार्वजनिक ठिकाणी घडलेला प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

Amravati Crime News : या मारहाणीत जखमी झालेला युवक मृत्यूशी झुंज देत असून सार्वजनिक ठिकाणी घडलेला प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

Amravati Crime News : या मारहाणीत जखमी झालेला युवक मृत्यूशी झुंज देत असून सार्वजनिक ठिकाणी घडलेला प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

अमरावती, 30 मार्च : अमरावती शहरातील (Amravati City) नवसारी येथील यश बारजवळ सोमवारी सायंकाळी धुलिवंदनाच्या दिवशी सहा जणांनी एका 21 वर्षीय युवकाला काठीच्या साहाय्याने बेदम मारहाण केली आहे. या मारहाणीत जखमी झालेला युवक मृत्यूशी झुंज देत असून सार्वजनिक ठिकाणी घडलेला प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

सीसीटीव्ही व्हिडिओत सहा जण एका युवकाला मारहाण करताना दिसत आहेत. यातील जखमी आणि मारेकरी दोन्ही गुंडगिरी प्रवृत्तीचे असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. एका जुन्या वादातून धुलिवंदनाच्या दिवशी हा राडा झाला. भूषण पोहोकार (वय 21) असं जखमी युवकाचं नाव असून तो रस्त्याने जात असताना जुना वचपा काढण्यासाठी 6 युवक दबा धरून बसले होते. त्यांनी भूषणला पकडून काठी आणि लाथा-बुक्क्यांनी जबर मारहाण केली. यात भूषण पोहोकार गंभीर जखमी झाला असून त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे, तर गाडगेनगर पोलिसांनी 5 जणांना अटक केली असून यातील एक जण पसार झाला आहे.

हेही वाचा - संतापजनक! मित्राच्या बहिणीवर झालं प्रेम; भावाने दगडाने ठेचून केली हत्या

अटक करण्यात आलेल्या आरोपींमधील 4 जण अल्पवयीन आहे. या घटनेनंतर अमरावती जिल्हात खळबळ उडाली असून मारहाणीचे दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे.

शहरात लॉकडाऊनमध्ये अनेक युवकांच्या हाताला काम मिळत नाही, तसंच शाळा व कनिष्ठ महाविद्यालयात शिकणारे विद्यार्थी सध्या घरीच राहत असल्याने काही भागातील विद्यार्थ्यांचा कल हा गुन्हेगारी प्रवृत्तीकडे वाढताना दिसत आहे. त्यामुळेच शहरात गेल्या काही दिवसांपासून दुचाकी वाहने आणि मोबाईल चोरीच्या घटना वाढल्या आहेत.

गुन्हेगारी प्रवृत्तींना आळा बसावा यासाठी अमरावतीच्या पोलीस आयुक्त आरती सिंग तसंच जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ हरी बालाजी यांनी पोलिसांचं विशेष पथक तयार केलं आहे. काही दिवसांपूर्वी अमरावती पोलीस आयुक्त कार्यालय तसेच ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या वतीने तपासात मोठ्या प्रमाणात पोलिसांना सापडलेले मोबाईल त्या त्या व्यक्तींना परत करण्यात आले. मात्र अल्पवयीन युवक जर गुन्हेगारी प्रवृत्तीकडे वळत असेल तर त्याला वेळीच आळा घालणं गरजेचे आहे.

First published:

Tags: Amravati, Crime news, Maharashtra, Mumbai, Violence