अमरावतीतून भाजपला मोठा धक्का, काँग्रेसने मारली बाजी

अमरावतीतून भाजपला मोठा धक्का, काँग्रेसने मारली बाजी

सत्तेच्या या फॉर्म्यूल्यानंतर आता भाजपला ग्रामीण भागातही फटका बसताना पाहायला मिळतो. कारण अमरावतीमध्ये भाजपचा सुपडासाफ झाला असं म्हणायला हरकत नाही.

  • Share this:

संजय शेंडे, प्रतिनिधी

अमरावती, 09 डिसेंबर : राज्यात झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांआधी भाजपचा मोठा दरारा होता. पण निवडणुकांमध्ये लागलेल्या निकालाने मात्र राज्यात ऐतिहासिक सत्ता पालट झाली. सगळ्यात जास्त जागा मिळवूनही भाजपला विरोधी पक्षात बसायला लागलं तर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस अशा तीन वेगळ्या विचारांच्या पक्षांनी एकत्र येत घरोबा केला. सत्तेच्या या फॉर्म्यूल्यानंतर आता भाजपला ग्रामीण भागातही फटका बसताना पाहायला मिळतो. कारण अमरावतीमध्ये भाजपचा सुपडासाफ झाला असं म्हणायला हरकत नाही.

अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे, चांदुर रेल्वे, त्याचप्रमाणे तिवसा येथे पंचायत समितीचा निकाल जाहीर झाला. यामध्ये यशोमती ठाकूर यांच्या तिवसा पंचायत समितीमध्ये 6 जागांवर काँग्रेस पक्षाने विजय मिळविल्याने शहरात काँग्रेसचा जल्लोष पहावयास मिळाला तर यावेळी तिवसा पंचायत समितीवरही काँग्रेसचाच झेंडा फडकणार आहे.

धामणगाव पंचायत समितीमध्ये देखील 8 जागांपैकी 6 जागांवर काँग्रेस तर फक्त 2 जागांवर भाजपला विजय मिळविता आल्याने काँग्रेस पक्षाची सत्ता याठिकाणी स्थापन होणार आहे. चांदूर रेल्वे पंचायत समितीवर भाजपचा झेंडा फडकला चांदूर रेल्वेत 6 जागेपैकी 4 जागा भाजपाने जिकंल्या तर दोन जागा काँग्रेसने जिंकल्या. एकंदरीत तिवसा आणि चांदुर रेल्वे काँग्रेस धामणगाव रेल्वेत भाजपने बाजी मारली तिवसा तालुक्यात काँग्रेस आमदार यशोमती ठाकूर तर धामणगाव रेल्वे, चांदूर रेल्वेत भाजप आमदार प्रताप अडसळ आणि काँग्रेस माजी आमदार विरेंद्र जगताप यांचे वर्चस्व पहावयास मिळाले.

इतर बातम्या - मुंबई-गोवा महामार्गासाठी वृक्षतोड झाली पण 10 वर्षांत एकही वृक्ष लावले नाही!

एकीकडे राज्यात भाजपचं डिमांड कमी होताना दिसत आहे तर दुसरीकडे भाजपमध्ये नेत्यांची अंतर्गत नाराजीही वाढताना दिसत आहे. विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपने महत्त्वाच्या नेत्यांनी संधी न दिल्याने आधीच धुसपूस सुरू आहे. त्यात आता सत्तेत नसल्याने भाजपचे बडे नेते पक्षाला रामराम ठोकण्याच्या तयारीत असल्याचं पहायला मिळतं.

सत्ता स्थापन झाल्यानंतर भाजपची आज औरंगाबादमध्ये विभागीय आढावा बैठक पार पडली. यामध्ये भाजपच्या बड्या नेत्या पंकजा मुंडे गैरहजर दिसल्या. पक्षाच्या कामावर पंकजा मुंडे नाराज असल्यामुळे त्या या सभेला हजर नसल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. याबद्द्ल भाजपच्या नेत्यांना विचारलं असता संध्याकाळी बीडमध्ये आढावा बैठकीत त्या उपस्थित राहतील अशी उत्तरं समोर आली. त्यामुळे पंकजा मुंडे आता बीडपुरत्याच मर्यादित राहिल्या का अशा चर्चांनाही राजकारणात रंग चढू लागला.

इतर बातम्या - स्मशानभूमीतच घेतला गळफास, चिठ्ठीत लिहलं धक्कादायक कारण...

निवडणुकांमध्ये झालेलं डॅमेज कंट्रोल सुधारण्यासाठी भाजपने विभागीय आढावा बैठकीचं नियोजन केलं आहे. त्यातून नेत्यांची नाराजी भाजपला दूर करता येईल का हे आता येता काळच सांगेल. पण सध्या मात्र भाजप डगमगला आहे हेच म्हणावं लागेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 9, 2019 05:00 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading