Home /News /maharashtra /

लग्न समारंभातून घरी जाताना तरुणांवर काळाचा घाला, दोन्ही भाऊ पडले मृत्यूमुखी

लग्न समारंभातून घरी जाताना तरुणांवर काळाचा घाला, दोन्ही भाऊ पडले मृत्यूमुखी

अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जबर धडक दिली. या अपघातात दोघांनीही आपला जीव गमावला आहे.

अमरावती, 28 नोव्हेंबर : अंजनगाव सुर्जी येथे नातेवाईकाच्या लग्नात आलेले चुलत भाऊ लग्न समारंभ आटपून रात्री साडेदहा ते अकराच्या दरम्यान आपल्या डिस्कव्हर गाडीने कसबेगव्हाण या त्यांच्या गावी परतत होते. मात्र वाटेतच टाकरखेडा रोडवरील सरस्वती नगराजवळ अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जबर धडक दिली. या अपघातात दोघांनीही आपला जीव गमावला आहे. रस्त्याने वर्दळ नसल्याचा फायदा घेत धडक देणाऱ्या वाहनचालकाने पलायन केले. अज्ञात वाहनाने दिलेली धडक एवढी जबर होती की गाडीच्या समोरचा भाग चक्काचूर होऊन गाडी रस्त्याच्या बाजूला फेकली गेली. या धडकेत विनय चरणदास दामले वय 26 व त्याचा चुलत भाऊ आकाश बाबाराव दामले वय 23 रा. कसबेगव्हाण हे जखमी झाले. त्यातील विनय चरणदास दामले याने जागीच प्राण सोडले. तर आकाश बाबाराव दामले याचा रुग्णालयात नेत असताना मृत्यू झाला. वडिलांसोबत दुर्दैवी प्रसंग जखमीचे वडील हे देखील त्याच लग्न समारंभातून परत कसबेगव्हान येथे जात असल्याने वाटेत त्यांना आपल्या मुलाचा अपघात झाल्याचं कळालं. त्यांनी घटनास्थळावर धाव घेतली. मात्र जखमी आकाशची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यास ग्रामीण रुग्णालयात अंजनगाव सुर्जी इथं उपचार करण्यास नेत असतानाच वाटेत त्याची प्राणज्योत मालवली. सदर घटनेबाबत अज्ञात वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पी.एस.आय.अनिल कवीटकर ठाणेदार राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करत आहेत.
Published by:Akshay Shitole
First published:

Tags: Amravati, Road accident, महाराष्ट्र amravati

पुढील बातम्या