यवतमाळ, 29 डिसेंबर : यवतमाळ शहरात सुरू असलेल्या ऑनलाइन क्रिकेट सट्ट्यावर पोलिसांनी धाड टाकून 4 जणांना अटक केली आहे. तसंच सदर आरोपींकडून पोलिसांनी रोख 3 लाख 18 हजार रुपयांसह साडेसहा लाखांचा मुद्देमाल जप्त केला.
सध्या ऑस्ट्रेलियामध्ये बिग बॅश क्रिकेट लीग स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेदरम्यान यवतमाळ शहरात ऑनलाइन सट्टा मोठ्या प्रमाणात सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यावरून पोलिसांनी सापळा रचला आणि महिला अत्याचार कक्ष व सायबर सेलच्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून सट्टा सुरू असलेल्या प्रतिष्ठानवर धाड टाकली.
यावेळी ऑनलाइन क्रिकेट सट्टा सुरू होता. घटनास्थळावरून सट्टा लावणाऱ्या 4 जणांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून रोख 3 लाख 18 हजार रुपये आणि साडे तीन लाख रुपयांचे इतर साहित्य असा एकूण साडे सहा लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
हेही वाचा -मुंबईत भीषण अपघात, डंपर चालकाने पोलीस कर्मचाऱ्याला चिरडले
दरम्यान, या कारवाईनंतर सट्टेबाजी करणाऱ्यांमध्ये चांगलीच खळबळ उडाली असून येत्या काही दिवसांमध्ये इतर ठिकाणीही पोलिसांकडून कारवाई होण्याची शक्यता आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.