मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

मेळघाटात मृतावस्थेत आढळले बाळ, अनैतिक संबंधातून केलं कृत्य?

मेळघाटात मृतावस्थेत आढळले बाळ, अनैतिक संबंधातून केलं कृत्य?

पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृत बाळाला उपजिल्हा रुग्णालयात ठेवलं आहे.

पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृत बाळाला उपजिल्हा रुग्णालयात ठेवलं आहे.

पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृत बाळाला उपजिल्हा रुग्णालयात ठेवलं आहे.

अमरावती, 24 जानेवारी : अमरावती जिल्ह्यातील धारणी तालुक्यात उकूपाटी येथे एक बाळ मृतावस्थेत आढळून आलं आहे. धारणी पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृत बाळाला उपजिल्हा रुग्णालयात ठेवलं. या घटनेमुळे आरोग्य यंत्रणेत खळबळ उडाली आहे. धारणी शहरापासून 7 किमी अंतरावर असणाऱ्या उकूपाठी जवळील काटेरी झुडपात बाळ असल्याची माहिती धारणी पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक विलास कुलकर्णी यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता तेथे बाळ मृतावस्थेत आढळून आले. परंतु ते स्त्री की पुरुष जातीचे हे कळू शकले नाही. हेही वाचा - स्ट्रॉबेरी विक्रेत्याची निर्घृण हत्या, धक्कादायक कारण आलं समोर पोलिसांनी तपासाची सूत्रे हलवत बाळ फेकणाऱ्या अज्ञात व्यक्तीचा शोध सुरू केला आहे. अनैतिक संबंधातून हे अभ्रक जन्माला आले असावे, असा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून वर्तवण्यात आला आहे. हेही वाचा - खळबळजनक! क्रिकेटवरून झालेल्या वादातून थेट गोळीबार, तरुण गंभीर जखमी मागील वर्षी धारणी शहरात मेळघाट बारच्या मागे एक स्त्री अभ्रक आढळून आले होते. त्यामुळे पोलीस या प्रकरणी कसून तपास करत असल्याची माहिती धारणी पोलीस स्टेशनचे निरीक्षक विलास कुलकर्णी यांनी दिली आहे.
First published:

Tags: Amravati, Crime news, अमरावतीamravati

पुढील बातम्या