मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

भयंकर! आजारातून बरं करण्यासाठी 3 वर्षांच्या चिमुकल्याला दिले गरम चटके

भयंकर! आजारातून बरं करण्यासाठी 3 वर्षांच्या चिमुकल्याला दिले गरम चटके

पोटफुगीवर उपचार म्हणून गरम सळीचे चटके मुलांच्या पोटावर दिल्याचा अनेक घटना या आधीही समोर आल्या आहे.

पोटफुगीवर उपचार म्हणून गरम सळीचे चटके मुलांच्या पोटावर दिल्याचा अनेक घटना या आधीही समोर आल्या आहे.

पोटफुगीवर उपचार म्हणून गरम सळीचे चटके मुलांच्या पोटावर दिल्याचा अनेक घटना या आधीही समोर आल्या आहे.

अमरावती, 01 ऑगस्ट : आजारातून बरं करण्यासाठी 3 वर्षांच्या चिमुकल्याच्या पोटावर गरम चटके दिल्याचा भयंकर प्रकार समोर आला आहे. अंधश्रद्धेतून हा धक्कादायक प्रकार घडल्याची माहिती मिळाली आहे. चिमुकल्याला पोटावर गरम चटके दिल्यानं गंभीर जखमी झाला असून सध्या त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा तालुक्यातील लवादा 3 वर्षांच्या मुलाचं पोट दोन दिवसांपासून फुगले होतं. या मुलाला उपचारासाठी दवाखान्यात घेऊन जाण्याऐवजी त्यावर उपचार म्हणून पोटवर गरम सळीचे चटके दिल्याचा प्रकार समोर आला. सध्या गंभीर जखमी असलेल्या मुलावर सामाान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हे वाचा-VIDEO : घरकाम करणाऱ्या महिलेची 3 वर्षांच्या चिमुकल्याला लाथा-बुक्क्यांनी मारहाण अंधश्रद्धेमुळे या चिमुकल्याचा जीव धोक्यात होता. त्याच्या पोटावर जखमा झाल्यानं त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल कऱण्यात आलं होतं. आता या मुलाच्या प्रकृतीत हळूहळू सुधारणा होत असल्याची माहिती रुग्णालयाकडून मिळाली आहे. मेळघाटातील चिमुकल्यांना वारंवार पोटफुगी या आजाराचा सामना करावा लागत आहे. यावर डॉक्टरकडे जाण्याऐवजी अनेक ठिकाणी आदिवासी पाड्यावर उपचार म्हणून गरम सळीचे चटके मुलांच्या पोटावर दिल्याचा अनेक घटना या आधीही समोर आल्या आहे. हे वाचा-पोलीस हत्येचा तपास करत असतानाच 'ती' परतली, व्हिडीओ टाकत म्हणाली...'मी जिवंत आहे' यापूर्वी चिखलदरा तालुक्यातील बोरगाव इथे जाणू सज्जन तोटा या बालकालाही सळीने चटके दिल्याचे प्रकरण 18 जून महिन्यात समोर आलं होतं. या प्रकरणात चटके देणारा आणि वडिलांविरोधात चिखलदरा पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. मात्र तरीही अंधश्रद्धेतून मेळघाटात वारंवार चटके देण्याचे प्रकरण पुढे येत असल्याने आता शासनाने कडक पाऊल उचलणे गरजेचं आहे
First published:

Tags: Amravati

पुढील बातम्या