मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /विचित्र अपघातानंतर बाईकला लागली आग, 2 मुलांचा होरपळून मृत्यू

विचित्र अपघातानंतर बाईकला लागली आग, 2 मुलांचा होरपळून मृत्यू

विचित्र अपघातात दुचाकीला लागलेल्या आगामुळे दोन मुलांचा होरपळून मृत्यू झाला आहे.

विचित्र अपघातात दुचाकीला लागलेल्या आगामुळे दोन मुलांचा होरपळून मृत्यू झाला आहे.

विचित्र अपघातात दुचाकीला लागलेल्या आगामुळे दोन मुलांचा होरपळून मृत्यू झाला आहे.

अमरावती, 30 जानेवारी : अमरावती-परतवाडा मार्गावर झालेल्या विचित्र अपघातात दुचाकीला लागलेल्या आगामुळे दोन मुलांचा होरपळून मृत्यू झाला आहे. ही काळीज पिळवटून टाकणारी घटना अमरावती जिल्ह्यातील आसेगाव पूर्णा येथे घडली.

निवृत्ती दीपक सोलव (15) आणि राज अनंत वैद्य (18, दोघेही रा. तळणी पूर्णा) असं होरपळून मृत झालेल्या मुलांची नावे आहेत.

घटनेच्या वेळी निवृत्ती सोलव व राज वैद्य हे अचलपूर तालुक्यातील तळणीपूर्णा येथून दुचाकीने आसेगावकडे जात होते. त्याचवेळी विरुद्ध दिशेने येणाऱ्या बोलेरो पिकअप वाहनाची त्यांच्या दुचाकीला जबर धडक बसली.

हेही वाचा - चालत्या गाडीत चढताना अडकला 79 वर्षांचा प्रवासी, RPF जवानामुळे वाचला जीव

या अपघातानंतर पिकअप वाहनाच्या समोरच्या चाकात आलेल्या दुचाकीने अचानक पेट घेतला. त्यामध्ये निवृत्ती सोलव याचा भाजल्याने घटनास्थळीच मृत्यू झाला, तर राज वैद्य याला उपचारासाठी रुग्णालयात आणत असताना वाटेतच मृत्यू झाला.

हेही वाचा - तब्बल 10 वर्षे आईच्या मृतदेहासोबत एकाच छताखाली राहत होती मुलगी; कारण ऐकून परिसरात खळबळ

दरम्यान, या दुर्दैवी घटनेनंतर घटनास्थळी मोठ्या प्रमाणावर नागरिकांची गर्दी झाल्याचं पाहायला मिळालं. तसंच दोन मुलांच्या मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

First published:

Tags: Amravati, Road accident