मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

NCP Amol Mitkari : विधीमंडळाच्या पायऱ्यांवरच्या राड्याचा घटनाक्रम अमोल मिटकरींनीच सांगितला म्हणाले शिवीगाळ

NCP Amol Mitkari : विधीमंडळाच्या पायऱ्यांवरच्या राड्याचा घटनाक्रम अमोल मिटकरींनीच सांगितला म्हणाले शिवीगाळ

राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी आणि शिंदे गटाचे आमदार महेश शिंदे यांच्यात जोरदार वादावादी झाली. यामध्ये अमोल मिटकरी यांनी जोरदार सत्ताधाऱ्यांवर टीका केली.

राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी आणि शिंदे गटाचे आमदार महेश शिंदे यांच्यात जोरदार वादावादी झाली. यामध्ये अमोल मिटकरी यांनी जोरदार सत्ताधाऱ्यांवर टीका केली.

राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी आणि शिंदे गटाचे आमदार महेश शिंदे यांच्यात जोरदार वादावादी झाली. यामध्ये अमोल मिटकरी यांनी जोरदार सत्ताधाऱ्यांवर टीका केली.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Sandeep Shirguppe

मुंबई, 24 ऑगस्ट : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षानंतर राज्याचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. दरम्यान मागच्या तीन चार दिवसांपासून विरोधक सत्ताधाऱ्यांच्या विरोधात विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन करत होते. (NCP Amol Mitkari) दरम्यान आज सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये गोंधळ पाहायला मिळाला. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये धक्काबुक्की झाली. यामध्ये राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी आणि शिंदे गटाचे आमदार महेश शिंदे यांच्यात जोरदार वादावादी झाली. यामध्ये अमोल मिटकरी यांनी जोरदार सत्ताधाऱ्यांवर टीका केली.

यावेळी मिटकरी म्हणाले, शिवसेनेच्या महेश शिंदे यांनी धक्काबुक्की केली, घाणेरडी शिवीगाळ केली, त्यांनी आम्हाला आई बहीणीवरून शिवी दिली. तसेच यानंतर मिटकरींनी शिंदे यांची तक्रार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली. अखेर अजित पवार आले आणि आम्हाला बाजुला होऊया म्हणाले. त्यामुळे आम्ही बाजुला झालो असल्याचे मिटकरी यांनी सांगितली.

हे ही वाचा : अंगावर आला तर सोडणार नाही, शिंदे गटाचे भरत गोगावलेंचा इशारा

पन्नास खोके एकदम ओके हा नारा दिल्याने शिंदे गटातील आमदारांना झोंबल्याने त्यानी हे कृत्य केले आहे. आम्ही त्यांना डिवचले नाही त्यांनीच आम्हाला डिवचले आहे. आम्ही घोषणा दिल्या उलटा चोर कोतवाल को डाटे अशीच अवस्था सत्ताधाऱ्यांची झाली आहे. धक्काबुक्की करणारे आमदार कोण होते त्यांना मी ओळखत नाही. आम्हाला अजितदादा पवारांनी सभागृहाच्या पायऱ्यांवर बोलावले होते त्यानुसार आम्ही आंदोलनासाठी आलो होते. परंतु यांनी जे काही अशोभनीय वर्तन केले आहे ते संविधाना धरून नसल्याचे मिटकरी म्हणाले.

भरत गोगावले यांचा पलटवार

भरत गोगावले म्हणाले कि, आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत. डरपोक आहोत काय? असं भरत यांनी म्हटलं. शिंदे गटातील नेत्यांनी संताप व्यक्त केला आहे. आमच्या नादी लागू नका आमच्या अंगावर आला तर आम्ही तुम्हाला शिंगावर घेऊ. पिक्चर अभी बाकी है! हा फक्त ट्रेलर आहे असल्याचा थेट इशारा भरत गोगावले यांनी दिला आहे. ते आमच्या अंगावर आले नाही त्यांच्या अंगावर आम्ही गेलो होते. आम्हाला पाय लावायचा विचार केला तर सोडणार नाही असेही ते म्हणाले.

हे ही वाचा : आमदारांनी 'पायरी' सोडली, विधिमंडळाच्या पायऱ्यांवर सत्ताधारी आणि विरोधक भिडले

आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत. डरपोक आहोत काय? असे गोगावले म्हणाले. याचबरोबर शिंदे गटातील नेत्यांनी संताप व्यक्त केला आहे. आमच्या नादी लागू नका असा इशारा भरत गोगावले यांनी दिला आहे. हा फक्त ट्रेलर होता अजून अख्खा सिनेमा बाकी आहे. विरोधकांनी 50 खोके एकदम ओके म्हणत शिंदे गटातील आमदारांना डिवचण्याचा गेले काही दिवस प्रयत्न केला होता. त्यानंतर या आरोपांना उत्तर देण्यासाठी शिंदे गटातील आमदार विधीमंडळ्याच्या पायऱ्यांवर आंदोलन करत होते. यावेळी सत्ताधारी आणि विरोधक एकमेकाला भिडले.

First published:

Tags: Ajit pawar, NCP, Vidhan sabha