जिजाऊ जन्मोत्सव : डॉ. अमोल कोल्हेंचा 'मराठा विश्वभूषण' पुरस्काराने होणार सन्मान

जिजाऊ जन्मोत्सव : डॉ. अमोल कोल्हेंचा 'मराठा विश्वभूषण' पुरस्काराने होणार सन्मान

बुलडाण्यात आज 12 जानेवारी रोजी राष्ट्रमाता जिजाऊ जन्मोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. सिंदखेड राजामध्ये लाखो जिजाऊमाता भक्त दाखल होणार आहे.

  • Share this:

सिंदखेड राजा, 12 जानेवारी : सिंसदखेड राजा इथं आज (शनिवारी) 421 व्या जिजाऊ महोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आलं आहे. यावेळी स्वराज्यरक्षक संभाजी या मालिकेत संभाजी महाराजांची भूमिका साकारणारे अभिनेते डॉ. अमोल कोल्हे आणि सर्जिकल स्ट्राइकचे मुख्य सेनापती लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर यांना 'मराठा विश्वभूषण' या पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.

बुलडाण्यात आज 12 जानेवारी रोजी राष्ट्रमाता जिजाऊ जन्मोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. सिंदखेड राजामध्ये लाखो जिजाऊमाता भक्त दाखल होणार आहे. यावेळी डॉ.अमोल कोल्हे, राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले, संभाजीराजे भोसले, बाबाजीराजे भोसले, जन्मेजय राजे भोसले, शिवेंद्रराजे भोसले, सर्जिकल स्ट्राईकचे मुख्य सेनापती लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह अनेक दिग्गज उपस्थित राहणार आहे.

कसा असेल जिजाऊ जन्मोत्सव सोहळा?

या सोहळ्याला सकाळी 6 वाजता सुरूवात होईल. सकाळी 7 वाजता राजवाडा ते जिजाऊ सृष्टी अशी वारकरी दिंडी निघणार आहे. सकाळी 9 वाजता ध्वजारोहण होणार आहे. 9 ते 10 वाजेपर्यंत शाहिरांचे कार्यक्रम, 10 ते 1:30 वाजेपर्यंत जिजाऊसृष्टीवर सकाळचे सत्र होईल. यामध्ये सांस्कृतिक कार्यक्रम होतील आणि त्यानंतर उल्लेखनीय कार्य केलेल्यांचा विशेष सत्कार होणार आहे. यामध्ये जिजाऊ पुरस्कार अंतरराष्ट्रीय बॅडमिंटनपटू प्राजक्ता सावंत यांना देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.

VIDEO : 'उत्सवा'ला भ्रष्ट करू नका; अरुणा ढेरे यांचं परखड भाषण

First published: January 12, 2019, 7:12 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading