अमोल कोल्हे करणार 18 तारखेला मोठी घोषणा, राजकीय चर्चांना उधाण

अमोल कोल्हे करणार 18 तारखेला मोठी घोषणा, राजकीय चर्चांना उधाण

राष्ट्रवादीचे शिरुरचे खासदार अमोल कोल्हे यांनी फेसबुकवर एक पोस्ट टाकून धुराळा उडवून दिला आहे.

  • Share this:

मुंबई, 14 डिसेंबर : राष्ट्रवादीचे शिरुरचे खासदार अमोल कोल्हे यांनी फेसबुकवर एक पोस्ट टाकून धुराळा उडवून दिला आहे. येत्या 18 तारखेला मोठी घोषणा करणार, अशी पोस्ट त्यांनी केली आहे. भगवा रंगाच्या बॅकग्राऊंड असलेल्या या पोस्टमुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

अमोल कोल्हे यांनी आपल्या अधिकृत फेसबुक पेजवर दुपारी एक पोस्ट टाकली. A Big Announcement......On18th December!!! अशी ही पोस्ट आहे. या पोस्टमुळे अनेक जणांनी तर्कविर्तक लढवण्यास सुरुवात केली आहे.

काही जणांनी अमोल कोल्हे हे कॅबिनेट मंत्री व्हावे, अशी इच्छा बोलून दाखवली आहे. तर काही जणांनी अभिनंदन केलं आहे.

विशेष म्हणजे, अमोल कोल्हे यांनी बैलगाडी शर्यत आणि गड किल्ल्यांबद्दल आक्रमक भूमिका मांडली होती. त्यामुळे याबद्दल मोठा निर्णय होईल, का शक्यता वर्तवली जात आहे. तसंच पुढील आठवड्यात नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशनही सुरू होणार आहे. त्यामुळे या अधिवेशनामध्ये शिरूर बद्दल कोणती मोठी घोषणा होते का? हे पाहण्याचं ठरणार आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी अमोल कोल्हे हे शिवसेनेत होते. परंतु, सेनेला रामराम ठोकून त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. राष्ट्रवादीकडून त्यांनी लोकसभा निवडणूक लढवली आणि जिंकली. आता 18 तारखेला अमोल कोल्हे कोणती घोषणा करता हे उत्सुक्तेचं ठरणार आहे.

Published by: sachin Salve
First published: December 14, 2019, 7:32 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading