Home /News /maharashtra /

दीपिकाच्या सिनेमावर बहिष्कार टाकणे दुर्दैवी, अमोल कोल्हेंनी ट्रोल करणाऱ्यांना सुनावलं

दीपिकाच्या सिनेमावर बहिष्कार टाकणे दुर्दैवी, अमोल कोल्हेंनी ट्रोल करणाऱ्यांना सुनावलं

'दीपिका पदुकोण यांनी जी भूमिका घेतली ती व्यक्ती म्हणून की कलाकार म्हणून एवढी सुद्धा सजगता आपल्यात नसेल तर कुणीही पुढे येणार नाही'

अमरावती, 09 जानेवारी : बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण यांनी JNU च्या विद्यार्थांची भेट घेतली त्यामुळे काही कथित संघटनांनी कडाडून विरोधाची मोहिम उघडली आहे. राष्ट्रवादीचे खासदार आणि अभिनेते अमोल कोल्हे यांनी दीपिकाची पाठराखण करत ट्रोल करणाऱ्यांवर निशाणा साधला आहे. दीपिका पदुकोण यांनी JNU च्या विद्यार्थांची भेट घेतली. त्यामुळे त्याच्या चित्रपटावर बहिष्कार टाकण्यात आला. पण, एखाद्या सरकारच्या नीतीविरोधात एखादा कलाकार बोलतो तेव्हा त्याच्या विचारांचा सन्मान झाला पाहिजे, असं मत खासदार अमोल कोल्हे यांनी व्यक्त केलं. अमरावती इथं शिवपुत्र संभाजी महानाट्यची पत्रकार परिषद आयोजित केली होती, यावेळी ते बोलत होते. तसंच, दीपिका पदुकोण यांनी जी भूमिका घेतली ती व्यक्ती म्हणून की कलाकार म्हणून एवढी सुद्धा सजगता आपल्यात नसेल तर येथून पुढे कोणताही कलाकार बोलण्यास तयार होणार नाही, अशी संतप्त भावनाही कोल्हे यांनी व्यक्त केली. दीपिकाने JNU मध्ये जाऊन विद्यार्थ्यांना दिला पाठिंबा नवी दिल्लीतील जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी कॅम्पसमध्ये झालेल्या मारहाण आणि हल्ल्याच्या सर्वच स्तारातून निषेध होत आहे. बॉलिवडूची अभिनेत्री दीपिका पदुकोणही JNU मध्ये जाऊन विद्यार्थ्यांना पाठिंबा दिला.

दीपिकाच्या ‘छपाक’मध्ये आरोपी नदीमचं नाव राजेश आहे का? वाचा काय आहे सत्य

JNU हल्ल्याचे पडसाद संपूर्ण देशभरात उमटत आहे. या हिंसाचाराविरोधात आता बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रेटी रस्त्यावर उतरले असून आता स्टार अभिनेत्री दीपिका पदूकोणही जेएनयूमध्ये विद्यार्थ्यांच्या भेटीला दाखल झाली होती.  दीपिकाने साबरमती हॉस्टेलमध्ये जाऊन विद्यार्थ्यांची भेट घेतली आणि झालेल्या प्रकाराविरोधात निषेध वर्तवला आहे. यावेळी दीपिकाच्याबरोबर कन्हैया कुमारही उपस्थित होता. #boycottchhapaak ट्रोलिंग दीपिका जेएनयूमध्ये गेल्याच्या बातम्या माध्यमांवर पसरल्यानंतर नेटकऱ्यांनी दीपिकाला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. छपाक सिनेमावर बंदी आणावी यासाठी सोशल मीडियावर दीपिका विरोधात ट्रोलिंग सुरू झालं आहे.

कंगनाच्या बहिणीवरही झाला होता भीषण अॅसिड अटॅक; दीपिकाला पाठिंबा देण्याचं कारण

काही नेटकरी दीपिकाच्या विरोधात बोलत आहेत तर काही नेटकऱ्यांनी दीपिकाला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे ट्वीटरवर #boycottchhapaak आणि #ISupportDeepika असे दोन हॅशटॅग ट्रेंड करत आहेत. छपाक सारखा सिनेमा करणारी दीपिका तुकडे-तुकडे गँगला भेटण्यासाठी गेली अशा टीका करत नेटकऱ्यांनी दीपिकाचा छपाक सिनेमा पाहू नका असा ट्रेंड सुरू केला आहे.
Published by:sachin Salve
First published:

Tags: JNU

पुढील बातम्या