'मावळा छत्रपतींचं मन वळवू शकत नाही' उदयनराजेंच्या भेटीनंतर अमोल कोल्हेंचं वक्तव्य

राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. याच पार्श्वभूमीवर, राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हेंनी त्यांची भेट घेतली आणि त्यांचं मन वळवण्याचा प्रयत्न केला.

News18 Lokmat | Updated On: Sep 2, 2019 05:14 PM IST

'मावळा छत्रपतींचं मन वळवू शकत नाही' उदयनराजेंच्या भेटीनंतर अमोल कोल्हेंचं वक्तव्य

मुंबई, 2 सप्टेंबर : राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. याच पार्श्वभूमीवर, राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हेंनी त्यांची भेट घेतली आणि त्यांचं मन वळवण्याचा प्रयत्न केला.या दोन नेत्यांची बंद दाराआड पाऊण तास चर्चा झाली. पण ही चर्चा अयशस्वी ठरल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

मावळा छत्रपतींचं मन वळवू शकत नाही, या शब्दांत अमोल कोल्हे यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यावरूनच अमोल कोल्हे हे उदयनराजेंची मनधरणी करण्यात अपयशी ठरले हे स्पष्ट होतं.

उदयनराजेंची इच्छा असेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत त्यांचा भाजप प्रवेश केला जाईल, असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले होते. पण भाजपमध्ये जायचं की नाही हे मी माझं ठरवेन,असं उदयनराजेंचं म्हणणं होतं.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत उदयनराजे राष्ट्रवादीच्या तिकीटावर निवडून आले. उदयनराजेंना तिकीट देण्यात येऊ नये, असा आग्रह साताऱ्यातल्या नेत्यांनी पक्षाकडे धरला होता. पण उदयनराजेंचा वैयक्तिक करिष्मा पाहता राष्ट्रवादीने पुन्हा एकदा सातारा लोकसभेतून त्यांनाच संधी दिली.

'युती असल्याने इनकमिंगला मर्यादा पण लवकरच होणार मेगाभरती'

Loading...

उदयनराजेंनीही पक्षाचा विश्वास सार्थ ठरवला. या निवडणुकीत त्यांनी शिवसेनेच्या नरेंद्र पाटलांचा पराभव केला. पण लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील राजकीय वातावरणात मोठा बदल झाला आहे. देशभरात भाजपने मिळवलेल्या मोठ्या यशामुळे आघाडीतले नेतेही भाजपकडे ओढ घेऊ लागले आहेत. अशातच उदयनराजे भोसले हेदेखील पक्षबदलाच्या विचारात असल्याचं पाहायला मिळत आहे.

उदयनराजे हे सध्या राष्ट्रवादीच्या तिकीटावर खासदार आहेत. आता विधानसभा निवडणुकीआधी जर त्यांना राष्ट्रवादीतून भाजपमध्ये प्रवेश करायचा असेल तर त्यांना आपल्या खासदारकीचा राजीनामा द्यावा लागेल. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीसोबत सातारा मतदारसंघातील लोकसभेची पोटनिवडणूकही घेण्यात यावी, अशी अट उदयनराजेंनी भाजपकडे ठेवल्याचे समजते. पण राज्याची विधानसभा निवडणूक ऑक्टोबरमध्ये होऊ शकते, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे इतक्या कमी कालावधीत साताऱ्याची लोकसभा पोटनिवडणूक घेणं तांत्रिकदृष्ट्या कठीण असल्याचं बोललं जात आहे.

===============================================================================================

राज्याच्या राजकारणात नव्या नावाची चर्चा; पाहा न्यूज 18 लोकमतचा Exclusive रिपोर्ट!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 2, 2019 04:46 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...