• Home
  • »
  • News
  • »
  • maharashtra
  • »
  • 'सुदर्शन चक्रा'ने लंकेश, कलबुर्गी, पानसरेंचा खून, अमोल काळेच होता मास्टर प्लॅनर

'सुदर्शन चक्रा'ने लंकेश, कलबुर्गी, पानसरेंचा खून, अमोल काळेच होता मास्टर प्लॅनर

गौरी लंकेश हत्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी महाराष्ट्रात दाखल झालेल्या कर्नाटक एसआयटीने अमोल काळे यांच्या चौकशीतील मुद्दे आता समोर आणले आहेत.

  • Share this:
    दिनेश केळुसकर, प्रतिनिधी 28 ऑगस्ट : अमोल काळे हाच पानसरे, कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांच्या हत्यांचा सिनियर प्लॅनर होता अशी माहिती कर्नाटक एसआयटीच्या सूत्रांनी दिली आहे. गौरी लंकेश आणि नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणात एकाच दुचाकीचा वापर केला असल्याच्या माहितीवरून कर्नाटक एसआयटी आज महाराष्ट्रात गाडीच्या तपासणीसाठी दाखल झाली आहे आणि त्यात ही खळबळजनक माहिती एसआयटी सूत्रांकडून देण्यात आली आहे. दरम्यान या तिन्ही हत्या एकाच पिस्तूलाने केल्या गेल्याची माहितीही अमोल काळेने कर्नाटक एसआयटीला दिली आहे. अमोल काळेने या पिस्तूलला 'सुदर्शन चक्र' असं नाव दिलं होतं. श्रीकृष्णाचे शस्त्र म्हणून सुदर्शन चक्र असं नाव दिले असल्याची माहिती अमोल काळेने दिली आहे. त्यामुळे आता या सगळ्या दिग्गजांच्या हत्येच गूढ उकलणार यात काही शंकाच नाही. यासाठी महाराष्ट्र एटीएस, सीबीआय आणि कर्नाटक एसआयटी यांनी तपासाला वेग आणला आहे. गौरी लंकेश आणि डॉ. दाभोलकर यांच्या हत्येसाठीही एकच पिस्तूल वापरल्याचा सीबीआयने पुणे कोर्टात दावा केला होता. त्यामुळे चारही हत्या 7. 65 एम.एम साईझच्या एकाच पिस्टलने झाला का याचा आता तपास सुरू आहे. अमोल काळे, अमित डेगवेकर आणि राजेश बंगेरा यांनी पानसरे, कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांच्या हत्येचा प्लॅन आखला असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. यात अमोल काळे मास्टर प्लॅनर, अमित डेगवेकरने पैशांची व्यवस्था केली तर राजेश बंगेराने शस्त्र प्रशिक्षण आणि वाहन व्यवस्था सांभाळली असल्याचंही उघड झालं आहे.

    पिस्तूलनंतर गौरी लंकेश आणि दाभोलकर हत्येप्रकरणात समोर आला धक्कादायक खुलासा

    गौरी लंकेश आणि दाभोलकर यांच्या हत्येसाठी वापरण्यात आलेली गाडी ही एकच होती अशी माहिती आरोपी शरद कळसकर याने सीबीआयला दिली असल्याचं सुत्रांकडून सांगण्यात येत आहे. रविवारी सीबीआयने असा दावा केला होता की गौरी लंकेश आणि दाभोलकर यांची हत्या एकाच पिस्तूलाने करण्यात आली होती आणि आता त्यांच्या हत्येसाठी वापरण्यात आलेली गाडीदेखील एकच असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे नालासोपारा स्फोटक प्रकरणापासून ते औरंगबाद आणि नंतर जालनापर्यंत या प्रकरणाचे धागे-दोरे आता उघड होत आहे. शरद कळसकरने दिलेल्या माहितीनुसार, कर्नाटक एसआयटी गाडीची तपासणी करण्यासाठी महाराष्ट्रात दाखल झाली आहे.  या दोन्ही हत्यांमध्ये एकाच पल्सर मोटरसायकलचा वापर करण्यात आला असल्याची माहिती हाती लागली आहे. यासंबंधी कर्नाटक एसआयटी आणि महाराष्ट्र सीबीआय चर्चा करणार असल्याचंही सांगण्यात आलं आहे. एटीएस, सीबीआय दोन्ही तपास यंत्रणांशी कर्नाटक एसआयटी चर्चा करणार आहे.   या तारखेपर्यंत SBIचे डेबिट कार्ड नाही बदलले तर होईल नुकसान
    First published: