मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

अमित ठाकरे लोकलने पोहोचले डोंबिवलीला, शिवसेनेवर साधला निशाणा, म्हणाले...

अमित ठाकरे लोकलने पोहोचले डोंबिवलीला, शिवसेनेवर साधला निशाणा, म्हणाले...

'लोकांची कामं केली पाहिजे, या दोन्ही शहरांची अवस्था बकाल झाली आहे. शिवेसेनेकडून अपेक्षा ठेवून काही मिळणार नाही'

'लोकांची कामं केली पाहिजे, या दोन्ही शहरांची अवस्था बकाल झाली आहे. शिवेसेनेकडून अपेक्षा ठेवून काही मिळणार नाही'

'लोकांची कामं केली पाहिजे, या दोन्ही शहरांची अवस्था बकाल झाली आहे. शिवेसेनेकडून अपेक्षा ठेवून काही मिळणार नाही'

डोंबिवली, 01 ऑक्टोबर : राज्यात लवकरच महापालिका निवडणुकीच्या तारखा जाहीर होणार आहे. त्यामुळे सर्वच पक्षांनी राजकीय मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (raj thackery) यांचे चिरंजिव आणि नेते अमित ठाकरे (amit thackery) डोंबिवलीच्या (dombivali) दौऱ्यावर आहे. शहराची अवस्था पाहून शिवसेनेकडून (shivsena) अपेक्षा ठेवून काहीच मिळणार नाही, अशी टीका अमित ठाकरे यांनी केली आहे.

महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने राज ठाकरे यांनी अमित यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे. नाशिकचा दौरा केल्यानंतर अमित ठाकरे आज कल्याण-डोंबिवलीला पोहोचले आहे. विशेष म्हणजे, अमित ठाकरे डोंबिवलीला लोकलने प्रवास आले.  पदाधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर पत्रकार परिषद पार पडली.

'लोकलने प्रवास छान होता, खड्ड्यांमुळे लोकलने प्रवास केला.  कल्याण डोंबिवलीत खड्डे खूप आहेत, लोकांना खूप त्रास होतोय. अजूनही लोकलचा प्रवास सर्वसामान्यांना खुला झाला नाही. लोकांना तिकिटं द्यावी पास परवडत नाही, अशी मागणीही अमित ठाकरे यांनी केली.

IPL 2021 : ...म्हणून Warner ने सोडली आयपीएल, SRH मधून समोर आली धक्कादायक माहिती

'लोकांची कामं केली पाहिजे, या दोन्ही शहरांची अवस्था बकाल झाली आहे. शिवेसेनेकडून अपेक्षा ठेवून काही मिळणार नाही. या पक्षाकडे आता इच्छाशक्ती नाही, अशी टीकाही अमित ठाकरे यांनी केली.

बापरे! 2 महिने बाटलीत अडकला त्याचा प्रायव्हेट पार्ट; डॉक्टरांनी कापूनच टाकला

दरम्यान, आगामी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणूका अमित ठाकरे आणि मनसेच्या वरीष्ठ नेत्यांच्या नेतृत्वाखाली लढवल्या जाणार अशी चर्चा जोर धरू लागली आहे. त्यामुळे अमित ठाकरे दोन दिवसीय कल्याण डोंबिवली दौऱ्यावर आले आहे. अमित ठाकरे हे कल्याण डोंबिवलीमध्ये विशेष लक्ष घालणार आहे. कारण या दोन्ही शहरांनी मनसेला भरभरून मतदान केलंय. त्यामुळे आगामी निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर अमित ठाकरे पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेत आहे. यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह येतोय असं मत मनसेचे नेते आणि माजी आमदार बाळा नांदगावकर यांनी व्यक्त केलंय.

First published:

Tags: Dombivali, डोंबिवली