नांदेड, 7 जानेवारी : महाराष्ट्र दौऱ्यावर असलेले भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी आपले उर्वरित कार्यक्रम अचानक रद्द केले आहेत. अमित शहा नांदेड विमानतळावरून दिल्लीला रवाना झाले आहेत. शहांनी ऐनवेळी आपले कार्यक्रम रद्द का केले, याबाबतची माहिती अद्यापपर्यंत मिळू शकलेली नाही.
महाराष्ट्र दौऱ्यावर असलेले अमित शहा हे नांदेडमधील एका गुरूद्वाऱ्याला भेट देणार होते. तसंच स्थानिक कार्यकर्त्यांशी संवादही साधणार होते. पण सर्व कार्यक्रम रद्द करत त्यांनी दिल्ली गाठली आहे.
दरम्यान, रविवारी लातूरमध्ये झालेल्या कार्यक्रमात अमित शहा यांनी आक्रमक भाषण करत मित्रपक्ष शिवसेनेवर निशाणा साधला. त्यानंतर शिवसेनेनंही भाजपला जोरदार प्रत्युत्तर दिलं.
काय म्हणाले होते अमित शहा?
भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी केलेल्या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. राज्यात युती झाली तर ठिक, नाहीतर विरोधियोंको 'पटक' देंगे असा इशारा त्यांनी दिलाय. शहांचा हा इशारा नेमका कुणाला आहे यावर आता चर्चा सुरू झालीय. कार्यकर्त्यांनी प्रत्येक बुथ कसं जिंकता येईल ते बघावं असं आवाहनही त्यांनी कार्यकर्त्यांनी केलं. लातूर इथं पक्ष कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते.
मुख्यमंत्र्यांचीही फटकेबाजी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही युती बाबात एक मोठं विधान केलंय. राज्यात युतीचा निर्णय हा भाजपचे अध्यक्ष अमित शहाच घेतील असं ते म्हणाले. "महाराष्ट्रात युती होणार की नाही याची काळजी कार्यकर्त्यांनी करू नये तर त्यांनी कामाला लागावं. राज्यातल्या 48 पैकी 40 जागा जिंकण्याची तयारी ठेवावी." असं आवाहनही त्यांनी कार्यकर्त्यांना केलं.
सामनातून शिवसेनेचं उत्तर
शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामनाच्या अग्रलेखातून मोदी सरकारवर पुन्हा एकदा टीका करणारे शाब्दिक ठाकरी बाण सोडले आहेत. मोदी सरकारने केलेल्या रोजगार निर्मितीचा दावा सीएमआयई या संस्थेच्या अहवालाने कसा खोटा ठरवला, त्याची आकडेवारीसह माहिती सामना अग्रलेखातून जाहीर करण्यात आली आहे.
ज्या हातांनी मोठ्या अपेक्षेने मोदी सरकारला निवडून दिलं. त्यांना मोदी सरकारची जुमलेबाजी आता लक्षात आली असून रोजगार निर्मितीचा ढोल फुटल्यामुळे आता देशातील बेरोजगारांचे हात मोदी सरकारचे तख्त फोडण्यासाठी शिवशिवत असल्याचं सामना अग्रलेखातून म्हटलं आहे.
Special Report : नाराण राणे IN, शिवसेना OUT