‘राष्ट्रवादीच्या घड्याळावर’ भाजपचं लक्ष; अमित शहांच्या पुणे दौऱ्याचं ‘काऊंटडाऊन’ सुरू

‘राष्ट्रवादीच्या घड्याळावर’ भाजपचं लक्ष; अमित शहांच्या पुणे दौऱ्याचं ‘काऊंटडाऊन’ सुरू

राष्ट्रवादी काँग्रेसच्या बालेकिल्ल्यावर आता भाजपनं लक्ष केंद्रीय केलं आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंंडावर आता अमित शहा पुणे दौऱ्यावर येणार आहेत.

  • Share this:

पुणे, 5 फेब्रुवारी : पुणे हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जाते.  पण, याच बालेकिल्ल्याकडे भाजपनं आता लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर आपलं लक्ष केंद्रीत केलं आहे. त्यासाठी भाजप अध्यक्ष अमित शहा मैदानात उतरले आहेत. 9 जानेवारी रोजी अमित शहा पुण्यात भाजप पदाधिकाऱ्यांचा बुथ मेळावा घेणार आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील या बुथ मेळाव्याला हजर असणार आहेत. त्यामुळे या बुथ मेळाव्याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर आता भाजपनं तयारीला सुरूवात केली असून त्याच पार्श्वभूमीवर अमित शहा यांचा पुणे दौरा महत्त्वाचा आहे.

यापूर्वी अमित शहा यांना प्रकृती अस्वस्थामुळे महाराष्ट्र दौरा रद्द करावा लागला होता. शिवाय, ऐनवेळी कोल्हापूर दौरा देखल रद्द झाला होता. त्यामुळे आता पुणे दौऱ्याकडे विशेष लक्ष लागून राहिले आहे.

दरम्यान, अमित शहा यांच्या दौऱ्यादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विविध विकास कामांचं उद्घाटन देखील केलं जाणार आहे.

पुणे, बारामतीसाठी भाजपची जोरदार फिल्डींग

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपनं राष्ट्रवादी काँग्रेस अर्थात शरद पवारांना थेट आव्हान दिलं आहे. यापूर्वी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी देखील पक्षानं आदेश दिल्यास बारामतीतून निवडणूक लढवण्यासाठी तयार असल्याचं म्हटलं होतं. त्याला माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील ‘’येऊन तर बघ’’ अशा आपल्या खास शैलीमध्ये उत्तर दिलं होतं.

तसेच भाजप खासदार पुनम महाजन यांनी देखील शरद पवारांना लक्ष्य करत 'शकुनीमामाची उपमा' दिली आहे. शिवाय, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील वेळोवेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली होती.

राष्ट्रवादीसमोर भाजपचं तगडं आव्हान

पालिका निवडणुकीमध्ये भाजपनं पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा पराभव केला आहे. शिवाय, नगरपरिषदेच्या निवडणुकीमध्ये देखील राष्ट्रवादी काँग्रेसला अपेक्षित असं यश मिळू शकलं नाही. त्यामुळे राष्ट्रवादीसमोर आता भाजप तगडं आव्हान उभं करणार का? हे पाहावं लागणार आहे.

Special Report : मोदी विरुद्ध ममता की ममता विरुद्ध राहुल?

First published: February 5, 2019, 1:46 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading