मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /शिवरायांनी केवळ महाराष्ट्राचं नाहीतर देशाच्या दोन तृतीयांश भागावर राज्य केलं -अमित शहा

शिवरायांनी केवळ महाराष्ट्राचं नाहीतर देशाच्या दोन तृतीयांश भागावर राज्य केलं -अमित शहा

शिवाजी महाराजांची ही भव्य प्रतिमा तरुणांना विचार आणि प्रेरणा देत राहील.

पुणे, 19 डिसेंबर : कर्नाटकमध्ये शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबन (desecration of Chhatrapati Shivaji Maharaj Statue in Bengaluru)  करण्यात आल्यामुळे राज्यभरात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. देशाचे गृहमंत्री अमित शहा (amit shah) यांनी पुण्यात शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे भूमिपूजन केलं. यावेळी, 'शिवाजी महाराज यांनी केवळ महाराष्ट्र नाही तर देशाच्या दोन तृतीयांश भागावर राज्य केलं. त्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली' असं म्हणत त्यांनी आपली भूमिका मांडली.तसंच, 'आंबेडकरांनी दिलेलं संविधान जगभरातील सर्वश्रेष्ठ संविधान आहे. पण आंबेडकरांना अपमानित करण्याची एक ही संधी काँग्रेसने (congress) सोडली नाही' अशी टीकाही शहांनी केली.

पुण्यात अमित शहा यांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावर झाले. तसंच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य स्मारकाने भूमिपूजनही पार पडले. यावेळी अमित शहा यांनी कर्नाटकच्या घटनेवरून भाष्य केलं.

'बाबासाहेब आणि शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा संकल्प केला आहे. शिवाजी महाराजांची ही भव्य प्रतिमा तरुणांना विचार आणि प्रेरणा देत राहील. जेव्हा अंधार दाटलेला होता स्वराज्य हा शब्द उच्चारण अशक्य होत तेव्हा एक तरुण उठतो आणि स्वराज्य स्थापन करण्याची प्रतिज्ञा करतो आणि केवळ महाराष्ट्र नाही तर देशाच्या दोन तृतीयांश भागावर राज्य केलं. हिंदवी स्वराज्याची स्थापना त्यांनी केली. अष्टप्रधान मंडळाद्वारे प्रशासन राबवण्याचे काम केले, पहिलं आरमार आणि सेना उभी केली' असं अमित शहा म्हणाले.

तसंच, बाबासाहेब आंबेडकरांचं देशाचं संविधान लिहिण्यात मोठा वाटा आहे. देशातल्या मागसल्या लोकांसाठी संविधान लिहून उद्धार केला. प्रचंड अपमान कटुता झेलून ही ती संविधानात उमटू दिली नाही. आंबेडकरांनी दिलेलं संविधान जगभरातील सर्वश्रेष्ठ संविधान आहे. पण, आंबेडकरांना अपमानित करण्याची एक ही संधी काँग्रेस ने सोडली नाही, अशी टीका शहा यांनी काँग्रेसवर केली.

तसंच, बाबासाहेब आंबेडकरांना भारतरत्न हे बिगर काँग्रेसी सरकारने दिलं. संविधान दिवस साजरा केला जात नव्हता, कारण आंबेडकरांचे कौतुक झालं असतं. काँग्रेस आज ही विरोध करते. त्यांनी एक स्टॅम्प सुद्धा येऊ दिला नाही, असंही शहा म्हणाले.

बाबासाहेबांचं योगदान भाजपला उज्ज्वल करून दाखवायचं आहे. संविधानचा ग्रंथ म्हणून मोदी यांनी देश चालवत आहेत, असंही शहा म्हणाले.

पुण्यात आलोय. पुण्याच्या विकासासाठी मोदी सरकारने अनेक उपाय केले. विमानतळासाठी प्रयत्न केले पण काम थांबलंय. मोदींनी मेट्रोचं अनावरण केलं, केंद्राने स्मार्ट सिटी साठी 100 कोटी दिले. विस्टा ट्रेन सुरू केली, 1000 बस दिल्या. मुळा मुठासाठी 110 कोटी रुपयांचे काम सुरू आहे.  सर्वाधिक start up पुण्याचे काही आंतरराष्ट्रीय सुद्धा आहे. पुण्याच्या महापौरांसह अनेक विकास प्रकल्पाचं नियोजन सुरू आहे, असंही शहांनी सांगितलं.

First published:
top videos