अमित शहांसोबत पंकजाचं शक्तिप्रदर्शन, लाखो वंचितांच्या शक्तीकेंद्राची कथा!

अमित शहांसोबत पंकजाचं शक्तिप्रदर्शन, लाखो वंचितांच्या शक्तीकेंद्राची कथा!

भगवान भक्तीगडावरचा मेळावा म्हणजे राज्यातील लाखो वंचितांच्या अस्तित्वाची अभिव्यक्ती आहे. तो भक्ती आणि शक्तीचा संगम आहे 'भगवान भक्तीगड'

  • Share this:

बीड, 08 ऑक्टोबर : राज्यातल्या तीन मोठ्या दसरा मेळाव्यापैकी एक असलेल्या भगवान भक्तीगडावरच्या मेळाव्याकडे सगळ्या राज्याच्या नजरा लागल्यात. कारण, भगवान भक्तीगडावर देशाचे गृहमंत्री अमित शाहा येणार आहेत. भगवान भक्तीगडावरचा मेळावा म्हणजे राज्यातील लाखो वंचितांच्या अस्तित्वाची अभिव्यक्ती आहे. तो भक्ती आणि शक्तीचा संगम आहे. भगवान भक्तीगड...राज्यातल्या लाखो वंचितांचं आणि अठरापगड जातींच्या कष्टकऱ्यांचं भक्तीस्थळ. जे साकारलंय भगवान बाबांच्या सावरगावातील पावन जन्मभूमीत. दसऱ्याच्या निमित्तानं इथं जमणाऱ्या लाखोंच्या गर्दीनं भगवान भक्तीगडाला वंचितांचं शक्तीस्थळ बनवलं आहे. दिवंगत गोपीनाथ मुंडेंनी भगवानगडावरून सुरू केलेली दसरा मेळाव्याची परंपरा त्यांच्या कन्या पंकजा मुंडेंनी भगवान भक्तीगडावरून  सुरू ठेवली. यावर्षीच्या मेळाव्याला देशाचे गृहमंत्री अमित शाहा उपस्थित राहाणार असल्यानं भगवान भक्तीगडाकडे अवघ्या देशाची नजर असणार आहे.

दिवंगत गोपीनाथ मुंडेंचा आवाज पाथर्डी तालुक्यातील भगवानगडावरून राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचला आणि त्याच आवाजानं भगवानबाबांच्या गडाला देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवलं. 1950 च्या दशकात सुधारणावादी संत भगवानबाबांनी आठरापगड जातीच्या लोकांना सोबत घेत पाथर्डी  तालुक्यात धौम्यगडाची स्थापना केली. त्याचं पुढे 1958 साली यशवंतराव चव्हाणांनी भगवानगड असं नामकरण केलं.

कोण होते भगवानबाबा?

- भगवानबाबाचं नाव आबाजी तुबाजी सानप

- जन्म २९ जुलै १८९६ रोजी सुपे सावरगावात झाला

- महाराष्ट्राच्या वारकरी संप्रदायातील संत म्हणून ओळख

- कीर्तनातून जातिभेद, अंधश्रद्धा, अनिष्ट रुढी-परंपरेवर प्रहार

- समता, बंधुता, मानवतेच्या आधुनिक विचारांचा प्रचार

- मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्रप्रदेशात अनुयायी

- कीर्तनकार म्हणून त्यांना प्रचंड लोकप्रियता मिळवली

- बाबांनी शेती विका पण शिका हा मंत्र दिला

बंकटस्वामीच्या विचारांचा भगवानबाबांवर मोठा प्रभाव होता. त्यामुळे त्यांनी संन्यासी धर्म स्वीकारला. पण भगवानबाबांनी भक्तीमार्गाबरोबरच त्यांनी आधुनेकतेची कास धरली. शिक्षणाचं महत्व ओळखलं. म्हणूनच त्यांनी एका बाजुला शेती विका पण शिका असा मंत्र दिला, तर दुसऱ्या बाजुला अंधश्रद्धेविरोधात लढत समाजाला भक्तीमार्ग दाखवला. भगवानबाबांनी महाराष्ट्र पिंजून काढत आपल्या ओजस्वी किर्तनातून शिक्षणाचा प्रसार केला. शाळा, कॉलेज, वसतीगृह उभारले. यातून अनेक मुलं शिकून वेगवेगळ्या क्षेत्रात गेली. भगवानबाबांनी जातीपातीच्या सीमा ओलांडत असंख्य लोक जोडले.

1951 ला भगवानबाबांनी स्वतः विजयदशमीला गडावर सोनं लुटण्यासाठी येणा-या लोकांना गुरुमंत्र देण्याचा कार्यक्रम सुरू केला. त्यालाच पुढे मेळाव्याचं स्वरुप आलं. महाराष्ट्रातल्या 15 जिल्ह्यात पसरलेले भगवान बाबांचे अनुयायी दरवर्षी भगवानगडार आवर्जून येतात.

इतर बातम्या - दुर्दैवी! लग्नासाठी घरी आलेल्या जवानाचा मृत्यू, दुचाकीवरून जाताना कारने उडवलं

80 च्या दशकात गोपीनाथ मुंडे नावाचं एक वादळ बीडमध्ये जन्म घेत होतं. गोपीनाथ मुंडेंची भगवानगडावर मोठी श्रद्धा होती. भगवानबाबांच्या विचारांचा हा गड आणि त्याच्याभोवती जोडल्या गेलेल्या लाखो अनुयायांचा गोपीनाथ मुंडे आवाज बनले. तेव्हापासून दसरा मेळावा आणि मुंडे हे समीकरण बनलं. इथल्या माणसांनी मनापासून त्यांचं नेतृत्व स्विकारलं. इथून मुंडे समाजाला संदेश द्यायचे. याच शोषित वंचितांनी गोपीनाथ मुंडेंना लोकनेता बनवलं आणि त्यातूनच भगवानगड एक राजकीय शक्तीकेंद्र म्हणून उदयाला आलं.

इतर बातम्या - पतीसाठी नराधमांचं ऐकलं, तिघांनी महिलेवर बलात्कार करून शूट केला VIDEO

राज्यातील 40 पेक्षा जास्त विधानसभा मतदारसंघावर थेट प्रभाव टाकणारा भगवानभक्तीगड ओबीसींची ताकत बनला. शिवाय मुंबईल्या हजारो टॅक्सी, ट्रॅकवर झळकणारं बाबाचं नाव ही त्यांच्याप्रती असलेली श्रद्धा आणि अस्मितेची ओळख आहे. गोपीनाथ मुंडेंच्या अकाली निधनानंतर पंकजा मुंडेंकडे नेतृत्व आलं. पण गडाभोवतीच्या शक्तीनं अनेकांच्या महत्वाकांक्षांना धुमारे फुटले. त्यातूनच पंकजा मुंडेंना भगवानगडावरून खाली उतरवण्यात आलं. दसरा मेळावा न घेण्याचा निर्णय गडाच्या विश्वस्तांनी घेतला. त्यानंतर मोठा वाद पेटला. त्यातून मार्ग काढत भगवानगडावरची दसरा मेळाव्याची परंपरा पंकजा मुंडेनी संत भगवान बाबांच्या जन्मभूमी असलेल्या सावरगावात सुरु ठेवली. भक्ती आणि शक्तीचा हा गड महाराष्ट्राच्या राजकारणात ओबीसींचं भक्ती आणि शक्तीस्थळ बनून नावारुपाला येतो आहे.

इतर बातम्या - प्रियकरासोबत बनवला पतीला संपवण्याचा प्लान, नवऱ्याचे तुकडे-तुकडे परिसरात फेकले

Published by: Renuka Dhaybar
First published: October 8, 2019, 1:49 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading