लातूर, 12 जानेवारी : लातूरचे प्रिन्स म्हणून ओळख असलेले अमित देशमुख हे देखील भाजपमध्ये येण्यासाठी उत्सुक असल्याचं वक्तव्य आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे लातूरच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. मात्र ते इच्छुक असले तरी आम्ही त्यांना पक्षात घेणार नाही असंही यावेळी निलंगेकर यांनी म्हटलंय. आपला राजकीय वारसा आणि सत्तेचा पायंडा शाबूत राखण्यासाठी अमित देशमुख हे भाजपच्या वाटेवर असल्याचं विधान निलंगेकर यांनी भाजप युवा मोर्चाच्या मेळाव्यात केलं.
लातूरचे प्रिन्स इच्छुक असले तरी आम्ही घेणार नाही, असं देखील स्पष्ट वक्तव्य संभाजी पाटील यांनी केलंय, त्यामुळे एकूणच लातुरच्या राजकारणात नव्या चर्चेला उधाण आलंय.
भाजपमध्ये जायच्या चर्चा, काँग्रेस आमदार अमित देशमुख यांनी सोडलं मौन#BJP #Congress #AmitDeshmukh pic.twitter.com/jmgM51GJz9
— News18Lokmat (@News18lokmat) January 12, 2023
दरम्यान अमित देशमुखांनी भाजपमध्ये जाण्याचा चर्चेला पूर्णविराम दिलाय. लातुरात देशमुख वाडा सुरक्षित असल्याचं अमित देशमुख म्हणाले आहेत.
कॉंग्रेस मधील अनेकजन भाजप मध्ये येण्यासाठी इच्छुक आहेत. शिवसेनेचे अनेक जण शिंदेंच्या संपर्कात आहेत. राष्ट्रवादीचे पण इच्छुक आहेत, असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.