Home /News /maharashtra /

रुग्णाला सोडून आल्यानंतर रुग्णवाहिका चालकाने उचलले टोकाचे पाऊल, बीडमध्ये खळबळ

रुग्णाला सोडून आल्यानंतर रुग्णवाहिका चालकाने उचलले टोकाचे पाऊल, बीडमध्ये खळबळ

 शुक्रवारी रात्री एका रुग्णाला सोडून आला होता. त्यानंतर अचानक दुसऱ्या दिवशी पहाटे घरात त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.

बीड, 25 सप्टेंबर : राज्यात आत्महत्या करण्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून चिंता व्यक्त केली जात आहे.  बीड (beed) जिल्ह्यातील धारूर ग्रामीण रुग्णालयाच्या (Dharur Hospital beed) परिसरात राहणाऱ्या कॉर्टरमध्ये 108 रग्णवाहिकेच्या चालकाने (Ambulance driver)  गळफास लावून आत्महत्या (commits suicide) केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार,  खोलेश्वर बाबूराव निर्मळ (वय 35) असं मयत 108 रुग्णवाहिका चालकाचे नाव आहे. आज भल्या पहाटे खोलेश्वर निर्मळ याने गळफास घेवून आत्महत्या केली. सकाळी दार उघडत नसल्यामुळे इतर कर्मचाऱ्यांनी घरात डोकावून पाहिले असला खोलेश्वर यांचा मृतदेह आढळून आला. रात्रीचे जेवण आणि शांत झोपेचा आहे असा संबंध; चांगल्या झोपेसाठी या गोष्टी गुणकारी खोलेश्वर निर्मळ हा रुग्णालयाच्या परिसरात असलेल्या कर्मचारी निवासस्थानी राहत होता. सध्या घरी तो एकटाच राहात होता. शुक्रवारी रात्री एका रुग्णाला सोडून आला होता. त्यानंतर अचानक दुसऱ्या दिवशी पहाटे घरात त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. दरम्यान, घटनेची माहिती समजताच धारूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. घराचा पंचनामा केल्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला.  खोलेश्वर निर्मळ याने अचानक इतक्या टोकाचे पाऊल का उचलले याचे कारण अद्याप समजू शकले नाही. गुलाब चक्रीवादळ बंगालच्या उपसागरात, राज्यात 3 ते 4 दिवस पावसाचा इशारा खोलेश्वर निर्मळ हे रुग्णवाहिकेवर चालक म्हणून काम करत होते.  गेल्या सहा वर्षांपासून कंत्राटी पद्धतीवर काम करत होते. तर त्याने आत्महत्या का केली याचा तपास धारूर पोलीस करत आहेत.
Published by:sachin Salve
First published:

पुढील बातम्या