Home /News /maharashtra /

सगळ्यांचा जीव वाचवण्यासाठी धडपडला पण त्याच्यावर काळाचा घाला, अपघातामध्ये जागीच ठार

सगळ्यांचा जीव वाचवण्यासाठी धडपडला पण त्याच्यावर काळाचा घाला, अपघातामध्ये जागीच ठार

चडचण-सोड्डी रोड जवळ अज्ञात वाहनाने रुग्णवाहिकेला धडक दिली. या अपघातामध्ये वाहन चालकाचा मृत्यू झाला असून एकजण गंभीर जखमी झाला आहे.

पंढरपूर, 04 फेब्रुवारी : रस्ते नियम न पाळल्यामुळे अपघातांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. असाच एक भीषण अपघात पंढरपूरमध्ये घडला आहे. एका अज्ञात वाहनाने धडक दिल्यामुळे 108 रुग्णवाहिकेला वेगात धडक दिली. यामध्ये वाहन चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. चडचण-सोड्डी रोड जवळ अज्ञात वाहनाने रुग्णवाहिकेला धडक दिली. या अपघातामध्ये वाहन चालकाचा मृत्यू झाला असून एकजण गंभीर जखमी झाला आहे. सतीश भीमराव देवकते असं मृत झालेल्या चालकाचं नाव आहे तर पोपट देवकते यांना उपचारासाठी दवाखान्यात दाखल केले आहे. सतीश भीमराव देवकते हे महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाच्या 108 गाडीचे चालक म्हणून काम करत होते. जनावरांना वैरण पाहण्यासाठी सतीश देवकते व त्यांचे चुलते पोपट देवकते चडचणला गेले होते. ते कामावर जात असताना सायंकाळी पाचच्या सुमारास ही घटना घडली. सतीश देवकते यांचा डोक्याला मार लागल्याने भरपूर रक्तस्त्राव होऊन जागीच मृत्यू झाला असून त्यांचे चुलते पोपट देवकते हे या अपघातात गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी चडचण येथील सरकारी दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे. इतर बातम्या - सच्चा भक्त! श्वानाने परफेक्ट सुरात गायले तुक्याचे अभंग VIDEO VIRAL सतीश देवकते भोसे प्राथमिक आरोग्य केंद्रातील 108 रुग्णवाहिका वर चालक म्हणून कार्यरत होते सतीश देवकते हे प्रहार जनशक्ती सांगोला तालुका अध्यक्ष आहेत. त्यांच्या अशा जाण्यामुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. दरम्यान, सोमवारी जळगावमध्येही भीषण अपघात झाला. हिंगोणा गावाजवळ क्रुझर आणि डंपरचा अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की यामध्ये 10 जणांचा जागीच मृत्यू झाला. इतर बातम्या - World Cancer Day : कॅन्सरची 'ही' सर्वसामान्य लक्षणं तुम्हाला माहीत हवीच रविवारी रात्री 11 च्या सुमारास हा अपघात झाला. यावल तालुक्यातील -फैजपूर रस्त्यावरील हिंगोणा गावाजवळ ही दुर्घटना घडली. दुर्घटनेत अनेक जण जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या यावल ग्रामीण रुग्णालयात उपचार करून जळगावला हलवण्यात आलं. या अपघातात चिंचोल गावातील एकाच कुटुंबातील दहा जणांचा मृत्यू झाल्यानं गावात शोकाकुल वातावरण आहे. डंपरच्या धडकेनंतर क्रूझर चालक धनंजय तायडे वाहनातच अडकले होते. जखमी चालकाला वाहनातून बाहेर काढण्यासाठी जेसीबीची मदत घेण्यात आली. यावल आणि सावदा पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. इतर बातम्या - राशीभविष्य: कुंभ राशीच्या लोकांना होणार धनलाभ, जाणून कसा असेल आजचा दिवस
Published by:Renuka Dhaybar
First published:

Tags: Pandharpur news

पुढील बातम्या