अखेर पाचव्या दिवशी आंबोलीच्या दरीतून एकाच मृतदेह दोरखंडाने बाहेर काढला

अखेर पाचव्या दिवशी आंबोलीच्या दरीतून एकाच मृतदेह दोरखंडाने बाहेर काढला

आंबोलीच्या दरीत कोसळून मृत्यूमुखी पडलेल्या दोन तरुणांपैकी प्रताप राठोड याचा मृतदेह कावळेसाद दरीतून अखेर बाहेर काढण्यास स्थानिक टीमला यश आलंय.

  • Share this:

04 आॅगस्ट : आंबोलीच्या दरीत कोसळून मृत्यूमुखी पडलेल्या दोन तरुणांपैकी प्रताप राठोड याचा मृतदेह कावळेसाद दरीतून अखेर बाहेर काढण्यास स्थानिक टीमला यश आलंय. दोरखंडाच्या साहय्याने त्याचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. तर इम्रान गार्दीच्या मृतदेहाचा मात्र अजूनही शोध लागू शकलेला नाही.

सोमवारी संध्याकाळी दारुच्या नशेत कावळेसाद पॉईंटवरून प्रताप राठोड आणि  इम्रान गार्दी  हे दोघे तरुण दारूच्या नशेत दरीत कोसळले होते. तेव्हापासून त्यांचे मृतदेह बाहेर काढण्यासाठी कोल्हापूरची एक टीम आणि स्थानिक पथकं कार्यरत होती.

आज पाचव्या दिवस अखेर बाबल अल्मेडा यांच्या टीमने दुपारी 1 वाजेच्या सुमारास 16 किलोमीटरचा दरीतून पायी प्रवास करून एकाचा मृतदेह बाहेर काढण्यात यश मिळवलंय. दुसऱ्या तरुणाचा मृतदेह मात्र अजूनही दरीतल्या पाण्याच्या प्रवाहात अडकून आहे.

First published: August 4, 2017, 6:31 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading