अंबरनाथ, 28 मे: दारूच्या नशेत मित्रांमध्ये वाद झाल्याने एका मित्राने दुसऱ्या मित्राच्या डोक्यात बियरची बाटली फोडल्याचा प्रकार समोर आला आहे. अंबरनाथ (Ambernath)मधील एका ढाब्या (Dhaba)वर हा प्रकार घडला आहे. ही संपूर्ण घटना तेथे लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद (Incident caught in CCTV) झाला आहे. डोक्यात बाटली फोडल्याने भीषण वाधवाणी हा तरुण जखमी झाला आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, अंबनाथ पूर्व येथे असलेल्या बारकू पाडा परिसरात एका ढाब्यावर मित्रांमध्ये वाद झाला. दारूच्या नशेत असलेल्या या मित्रांचा वाद इतका टोकाला गेला की एका मित्राने दुसऱ्याच्या डोक्यात चक्क बियरची बाटलीच फोडली. ढाब्यावर उभे असताना त्यांच्यात वाद झाला आणि त्यानंतर हा प्रकार घडला.
VIDEO: दारूच्या नशेत मित्राच्याच डोक्यात फोडली बाटली#Ambernath #Crime #CCTV pic.twitter.com/eetZEQG7Q6
— News18Lokmat (@News18lokmat) May 28, 2021
VIDEO: उल्हासनगरमध्ये इमारतीचा स्लॅब कोसळला; एकाचा मृत्यू, काहीजण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती
बारकू पाडा परिसरात सागर ठाकूर आणि भीषम वाधवानी हे दोघे आपल्या मित्रांसह एका ढाब्यावर उभे होते. यावेळी दारूच्या नशेत असलेल्या सागर ठाकूर याने पाठीमागून येथून भीषम यांच्या डोक्यात बियरची बाटली फोडली. या हल्ल्यात भीषमच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.
या प्रकरणी अंबरनाथ शिवाजी नगर पोलीस ठाण्यात सागर विरोधात गुन्हा दाखल करत त्याला ताब्यात घेण्यात आलं आहे. मात्र, प्रश्न हा आहे की, राज्यात कोरोनाची चेन तोडण्यासाठी लॉकडाऊन सुरू असताना अंबरनाथ येथे कुणाच्या आशीर्वादाने ढाबे सुरू आहेत. तसेच या ठिकाणी मद्यप्राशनही होत असल्याचं समोर येत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime