आज काढली जाणार आंबेनळी घाटातली ती अपघातग्रस्त बस

आज काढली जाणार आंबेनळी घाटातली ती अपघातग्रस्त बस

पण तब्बल दोन महिन्यानंतर स्टेअरिंगवर ठसे मिळतात का?

  • Share this:

रत्नागिरी-दापोली, 5 ऑक्टोबर : पोलादपूरमधील आंबेनळी घाटातील अपघातग्रस्त बस आज ६ ऑक्टोबर रोजी बाहेर काढण्यात येणार आहे. ही बस बाहेर काढल्यानंतर आता पुढील तपासाला दिशा मिळण्याची शक्यता आहे. संपूर्ण प्रकरणात महत्त्वपूर्ण असलेली बस बाहेर काढण्यासाठी २ महिने का लागले असा सवाल आता विचारण्यात येत आहे.

दापोली कोकण कृषी विद्यापीठातील आंबेनळी घाटातील ती दुर्घटनाग्रस्त बस दरीतून बाहेर काढणं फार महत्वाचं असल्याचं विद्यापीठ प्रशासनानं म्हटलं असून, बस दरीतून वर काढण्यासाठी कोकण कृषी विद्यापीठाची एक टीम शनिवारी आंबेनळी घाटाकडे रवाना होत आहे. अपघातग्रस्त बस दरीतून काढल्याशिवाय गाडीचा इन्शुरन्सदेखील मिळू शकत नाही, तसेच पोलिसांचा तपास सुद्धा पूर्ण होऊ शकणार नाही. त्यादृष्टीकोनातून दरीत कोसळलेली बस काढणे महत्वाचे आहे. त्यामुळे सकाळपासून ती बस दरीतून काढण्याला सुरुवात करण्यात येणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली.

महाराष्ट्रच नव्हे तर अवघा देश या घटनेने हादरला होता. मात्र, हा अपघात नेमका कशामुळे घडला याचं अद्याप कारण समजू शकलेले नाही. त्यामुळे या अपघातात घाटातून कोसळलेली बस बाहेर काढून त्याची तपासणी केली जाणार आहे. यावेळी तांत्रिक कारण समजण्याबरोबरच स्टेअरिंगवरील हाताचे ठसे मिळतात का हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.

एम.एच 08 ई 9087 या क्रमांकाची ही 30 आसनी बस होती. सर्व कर्मचारी राहुरी गहु संशोधन केंद्राला भेट देण्यासाठी महाबळेश्वर मार्गे चालले होते. पीएचएम रोहा येथुन ही गाडी प्रवासासाठी मागविण्यात आली होती. ही बस 28 जुलै रोजी सकाळी 6.55 वाजता मध्यवर्ती कार्यशाळेच्या आवारातून निघाली. त्यानंतर पोलादपूर महाबळेश्वर येथील आंबेनळी घाटात 11 ते 11.30 च्या दरम्यान हा दुर्देवी अपघात घडला. या अपघातात बस सुमारे तब्बल १२०० फूट दरीत कोसळली.

या अपघातात प्रकाश सावंत देसाई हे  एकमेव कर्मचारी बचावले. प्रकाश यांनी विद्यापीठाच्या चौकशी समितीपुढे दिलेल्या जबाबानुसार बसमधील वाहनचालक दोन वेळा बदली करण्यात आले. बस चांगल्या स्थितीत होती. सदर अपघातावेळी प्रशांत भांबिड हे मुख्य वाहन चालक हे बस चालवत होते.

दरम्यान, गाडी मातीच्या ढिगाऱ्यावरून डावीकडून खाली घसरून अपघात झाल्याचे सावंत देसाई यांनी चौकशी समितीसमोर सांगितले. पण असं असलं तरी बचावलेले प्रकाश सावंत देसाई यांच्यावर दापोलीचे आमदार संजय कदम यांच्यासह मृतांचे नातेवाईक यांनी संशय व्यक्त करणारे निवेदन शासनाकडे दिले आहे.

मात्र अद्याप प्रकाश सावंत देसाई यांच्याविरोधातील कोणताही पुरावा सुरक्षायंत्रणेला मिळालेला नाही. त्यामुळे आता बसच्या स्टेअरिंगवर हातांचे ठसे मिळाल्यास अपघातप्रसंगी कोण गाडी चालवत होते याची माहिती पुढे येण्याची शक्यता आहे. पण तब्बल दोन महिन्यानंतर स्टेअरिंगवर ठसे मिळतात का हेच पाहणं महत्त्वाचं आहे.

गडकरी म्हणतात, 'पवारसाहेब कधी काय बोलतील आणि काय करतील याचा नेम नाही'

First published: October 6, 2018, 9:13 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading