आंबेनळी अपघात : स्टेअरिंगवरचे ठसे शोधण्यासाठी तब्बल 2 महिन्यांनी बाहेर काढणार बस!

आंबेनळी अपघात : स्टेअरिंगवरचे ठसे शोधण्यासाठी तब्बल 2 महिन्यांनी बाहेर काढणार बस!

पोलादपूरमधील आंबेनळी घाटातील अपघातग्रस्त बस येत्या 6 आक्टोंबर रोजी बाहेर काढण्यात येणार आहे.

  • Share this:

रत्नागिरी, 04 ऑक्टोबर : पोलादपूरमधील आंबेनळी घाटातील अपघातग्रस्त बस येत्या 6 आक्टोंबर रोजी बाहेर काढण्यात येणार आहे. ही बस बाहेर काढल्यानंतर आता पुढील तपासाला दिशा मिळण्याची शक्यता आहे. पण अपघातात महत्त्वाची असलेली बस बाहेर काढण्यासाठी 2 महिने का लागले असा सवाल आता विचारण्यात येत आहे.

डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठातील 30 कर्मचाऱ्यांचा या अपघातात मृत्यू झाला होता. मात्र अपघाताचं नेमक कारण मात्र अद्याप समजू शकलं नाही आणि त्यामुळे आता या बसची तपासणी केल्यावर कदाचीत या अपघाताचं तांत्रिक कारण समजण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रच नव्हे तर अवघा देश या घटनेने हादरला होता. मात्र हा अपघात नेमका कशामुळे घडला याचे अद्याप कारण समजु शकलेले नाही. त्यामुळे या अपघातात घाटातून कोसळलेली बस बाहेर काढून त्याची तपासणी केली जाणार आहे. यावेळी तांत्रिक कारण समजण्याबरोबरच स्टेअरिंगवरील हाताचे ठसे मिळतात का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

एम.एच 08 ई 9087 या क्रमांकाची ही 30 आसनी बस होती. हे सगळे कर्मचारी राहुरी गहु संशोधन केंद्राला भेट देण्यासाठी महाबळेश्वर मार्गे चालले होते. पीएचएम रोहा येथुन ही गाडी या प्रवासासाठी मागविण्यात आली होती.

आंबेनळी बस अपघातापूर्वीचा VIDEO, बदलला होता ड्रायव्हर?

28 जुलै रोजी सकाळी 6.55 वाजता मध्यवर्ती कार्यशाळेच्या आवारातुन सुटली होती. त्यानंतर पोलादपूर महाबळेश्वर येथील आंबेनळी घाटात 11 ते 11.30 च्या दरम्यान हा दुर्देवी अपघात घडला होता. या अपघातात बस सुमारे तब्बल १२०० फूट दरीत कोसळली होती.

या अपघातात एकमेव प्रकाश सावंत देसाई हा कर्मचारी बचावला आहे. सावंत देसाई यांनी विद्यापीठाच्या चौकशी समितीपुढे दिलेल्या जबाबानुसार बसमधील वाहनचालक दोन वेळा बदली करण्यात आले. बस चांगल्या स्थितीत होती. सदर अपघातावेळी प्रशांत भांबिड हे मुख्य वाहन चालक हे बस चालवत होते.

दरम्यान गाडी मातीच्या ढिगा-यावरून डावीकडुन खाली घसरून हा अपघात झाल्याचे सावंत देसाई यांनी चौकशी समितीसमोर सांगितले आहे. पण असं असलं तरी बचावलेले प्रकाश सावंत देसाई यांच्यावर दापोलीचे आमदार संजय कदम यांच्यासह मृतांचे नातेवाईक यांनी संशय व्यक्त करणारे निवेदन शासनाकडे दिले आहे.

मात्र अद्याप प्रकाश सावंत देसाई यांच्याविरोधातील कोणताही पुरावा सुरक्षायंत्रणेला मिळालेला नाही. त्यामुळे आता बसच्या स्टेअरिंगवर हातांचे ठसे मिळाल्यास यावरूनचे नेमके अपघातप्रसंगी कोण गाडी चालवत होते याची माहिती पुढे येण्याची शक्यता आहे. पण तब्बल दोन महिन्यानंतर स्टेअरिंगवर ठसे मिळतात का हेच पाहणं महत्त्वाचं आहे.

VIDEO: लोकलमध्ये दरवाजात उभ्या असलेल्या तरुणीचा तोल गेला, मात्र...!

First published: October 4, 2018, 1:16 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading