आंबेनळी घाटात अपघातानंतर मृत कर्मचाऱ्यांचे मोबाईल गायब

आंबेनळी घाटात अपघातानंतर मृत कर्मचाऱ्यांचे मोबाईल गायब

बस अपघातातील कर्मचाऱ्यांच्या बॅग, घड्याळ, एटीएम कार्ड, आधारकार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, सोन्याची दागिने, रोख रक्कम आढळली होती.

  • Share this:

रत्नागिरी, 19 आॅगस्ट : आंबेनळी घाटात भीषण बस अपघातात दापोली कोकण कृषी विद्यापीठाच्या 30 कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. या अपघातातून प्रकाश सावंत देसाई हे एकमेव वाचले होते. अपघातानंतर सर्व कर्मचाऱ्यांच्या वस्तू पोलिसांनी राखून ठेवल्या होत्या. पोलिसांनी पंचनामा करून त्या मृतांच्या नातेवाईकांना सुपूर्द केल्यात. पण यातील काही वस्तू गायब असल्याचं निदर्शनास आलंय.

दापोली कोकण कृषी विद्यापीठाच्या 30 कर्मचा-यांचा 2८ जुलै 2018 रोजी  महाबळेश्वर- पोलादपूर  आंबेनळी घाटात 800 फूट खोल दरीत बस कोसळून मृत्यू झाला होता. बस अपघातातील दरीत घटनास्थळी काही कर्मचाऱ्यांचे मोबाईल आढळून आले होते. काही मोबाईल गायब आहेत. या मोबाईमुळे मृत्यूचे गूढ उकलेलं असं बोललं जातं आहे.  परंतु काही मोबाईल गायब आहेत. हे मोबाईल कुणी लंपास केली घटनास्थळी तुटली गेली याचा शोध घेतला जात आहे. त्यामुळे खरोखरच अपघाताचे गूढ पोलीस उकलणार का पाहावे लागणार आहे.

तसंच बस अपघातातील कर्मचाऱ्यांच्या बॅग, घड्याळ, एटीएम कार्ड, आधारकार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, सोन्याची दागिने, रोख रक्कम आढळली होती. पंचनाम्या दरम्यान वस्तूची ओळख पटविण्यात आली होती. सर्व वस्तूची  यादी या पूर्वीच तयार झाली होती. पोलादपूर पोलीस ठाण्याचे पोलीस सहाय्यक पोलीस निरीक्षक तथा या घटनेचा तपास करणारे अंमलदार प्रकाश पवार यांनी मृतांच्या नातेवाईकांना मृत कर्मचाऱ्यांचे पंचनामे, पी एम रिपोर्ट देण्यात आले. 30  कर्मचाऱ्यांच्या  नातेवाईकांना  आणि वस्तू, दागिने देण्यात आली. काही लोकांच्या घरी जाऊन तर काहींना विद्यपीठात बोलावून त्यांच्या वस्तू देण्यात आल्या.

आश्चर्याची गोष्ट म्हणजे अपघातस्थळी एका कर्मचाऱ्याचे  बंद पडलेले घड्याळ सापडले. या घड्याळीत 11 वाजून 15 मिनिटांनी बंद पडले आहे, त्यामुळे हा अपघात अकरानंतर झाला असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. 30 पैकी 14 कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांना तर उर्वरित कर्मचा-यांच्या नातेवाईक शनिवारी कागदपत्रे आणि समान, दागिने देण्यात आली.

तपासीक अंमलदार  प्रकाश पवार 17 आॅगस्ट रोजी दापोलीत आले होते. दापोली कोकण कृषी विद्यापीठाचे  प्रशासकीय इमारतीत मृतांच्या पत्नी आणि नातेवाईकांना बोलावण्यात आले होते. मृतांच्या नातेवाईकांना पंचनामा आणि पीएम रिपोर्ट ची सगळी कागदपत्रे देण्यात आली.

दरम्यान, आंबेनळी घाटात झालेल्या बस अपघाताच्या आठवणी अद्यापही ताज्या असतानाच या घटनेचे एकमेव साक्षीदार प्रकाश सावंत देसाई यांनी आपलं दुःख व्यक्त केलंय. घटनेचा एकमेव साक्षीदार असल्यानं पोलीस त्यांची चौकशी करतायत. पण यामुळे आपल्याला मानसिक त्रास होतोय अशी तक्रार सावंत यांनी केलीये.

----------------------------------------------------------------------------------------------------

संबंधित बातम्या

'या' कारणामुळे झाला आंबेनळी घाटातील अपघात

'मी वाचलो,पण आता मलाच त्रास होतोय'

VIDEO :'आंबेनळी घाटात बस कोसळली कशी ?,सीआयडी चौकशी करा'

---------------------------------------------------------------------------------------------------

 

स्ट्रेचरवरून मृतदेह खाली ठेवताना पोलीस कर्मचाऱ्याने मारली लाथ, VIDEO VIRAL

 

First published: August 19, 2018, 4:40 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading