दापोली, 30 आॅगस्ट : आंबेनळी घाटात बस दुर्घटनेप्रकरणी एकमेव बचावलेले प्रकाश सावंत देसाई यांच्यावरून दापोलीत एकच संशयकल्लोळ उडाला आहे. मृतांच्या नातेवाईकांनी तर प्रकाश सावंत यांच्या विऱोधात बुधवारी विद्यापीठावर मोर्चा काढला. तर दुसरीकडे दापोली विद्यापीठाने आपला चौकशी अहवाल अखेर सादर केलाय. या अहवालात प्रकाश सावंत देसाई यांनी क्लिन चिट देण्यात आलीये. पण, अपघातापूर्वी दोन व्यक्ती गाडी चालवत होते असंही नमूद केलंय.
२८ जुलैच्या सकाळी साडे १० च्या सुमारास आंबेनळी घाटात दापोली कृषी विद्यापीठाच्या बसला अपघात झाला आणि बसमधील ३0 जणांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेला एक महिना पूर्ण झाला. हृदय हेलावून टाकणाऱ्या या घटनेत प्रकाश सावंत देसाई नावाचे एक कृषी अधिकारी आश्चर्यकारक रित्या वाचले. मात्र या दुर्घेटनेतून बचावलेल्या प्रकाश सावंतावर अनेक आरोप झाले. स्थानिक लोकांपासून ते मृतांच्या नातेवाईकांनी सावंत यांच्यावर गंभीर आरोप केले.
दापोली कृषी विद्यापीठाच्या वतीने 12 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची एक समिती स्थापन केली होती. या समितीने घटनेशी संबंधीत व्यक्तींची चौकशी करून निष्कर्ष काढला.
- 6 जुलै 2018 रोजी 40 कर्मचाऱ्यांनी सहलीसाठी बसची मागणी केली होती. त्यानंतर रोहा येथून एमएच 08 ई 9087 ही बस मागवण्यात आली.
- 28 जुलैला जेव्हा सहल निघाली तेव्हा विद्यापीठातील कर्मचाऱ्यांनी बसला बाहेर जाताना पाहिले. या बससाठी दोन चालक होते. मुख्य बसचालक प्रशांत भांबीड आणि सहाय्यक संदीप झगडे.
- प्रवासादरम्यान बसमधील वाहनचालक दोनदा बदलण्यात आले होते. बसची स्थितीही चांगली होती. पण त्यानंतर आंबेनळी घाटात बसला अपघात झाला.
- प्रकाश सावंत देसाई यांच्या सांगण्यानुसार अपघाताच्या वेळी प्रशांत भांबीड हे बस चालवत होते. मातीच्या ढिगारावरून बसचे टायर घसरले आणि बस दरीत कोसळली असं सावंत यांनी सांगितलं.
असा हा अहवाल चौकशी समितीचे अध्यक्ष सतीश नारखेडे सदस्य डाॅ.ए.जी. मोहोड आणि डाॅ. हुकमतसिंह धाकड यांनी दिला.
एकंदरीतच जे सावंत यांनी सांगितलं आणि ज्यासाठी बसची मागणी झाले इथंपर्यंतची माहिती अहवालातून स्पष्ट करण्यात आली. मात्र, प्रकाश सावंत यांनी वेगवेगळी विधान केल्यामुळे संभ्रम निर्माण झाला हे पोलीस तपासातूनही पुढे आलं.
तर दुसरीकडे मृतांच्या नातेवाईकांनी या समितीचा अहवाल येण्याआधीच सीआयडी आणि प्रशांत सावंत यांची नार्को टेस्ट करावी अशी मागणी केलीये. यासाठी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही पत्रव्यवहार केलाय. तसंच विद्यापीठाने त्यांना सक्तीच्या रजेवरही पाठवलंय.
दापोली विद्यापीठाच्या अहवालात अपघाताच्या वेळी प्रशांत भांबीड हे बस चालवत होते. त्यामुळे प्रशांत सावंत देसाई यांनी क्लिन चीट देण्यात आली आहे. पण मृतांच्या नातेवाईकांनी प्रशांत सावंत हेच गाडी चालवत होते असा आरोप केला. त्यामुळे नेमकं बस कोण चालवत होते असा प्रश्नचिन्ह कायम आहे.
VIDEO : जगात पहिल्यांदाच झाला असा अपघात, कोट्यवधींच्या गाड्या समुद्रात बुडाल्या
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.