विकास भोसले, प्रतिनिधी
सातारा, 20 ऑक्टोबर : आंबेनळी घाटात पुन्हा एकदा भीषण अपघात झाला आहे. पोलादपूरहून माथेरानला जात असताना एक BMW कार दरीत कोसळली आहे. रस्त्यावरून 50 फूट खोल ही कार कोसळली आहे. पण सुदैवाने यात कोणतीही जीवित हानी झालेली नाही.
घाटातून गाडी जात असताना अचानक गाडीवर ताबा सुटला आणि गाडी दरीत कोसळली. पण दरीत असलेल्या दाट झाडीमुळे कार झाडाला अडकली आणि सुदैवाने मोठा अपघात टळला. गाडीमध्ये फक्त कार चालक होता. तो झाड्यांच्या मदतीने घाटातून सुखरूप वरती आला. घाटातून जात असताना कार चालकाचा ताबा सुटला आणि गाडी थेट दरीत कोसळली असल्याचा प्राथमिक अंदाज सध्या पोलिसांकडून बांधण्यात आला आहे.
या अपघातात कार चालक किरकोळ जखमी झाला आहे तर त्याच्यावर जवळच्या स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. नेमका हा अपघात कसा झाला याबद्द्ल अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
दरम्यान, आंबेनळी घाट अपघात म्हटलं की अंगावर काटा आणणार बस अपघात समोर उभा राहतो. 28 जुलै 2018 रोजी दापोली कृषी विद्यापीठांच्या प्राध्यापक आणि कर्मचाऱ्यांना घेऊन जाणारी बस पोलादपूर आंबेनळी घाटातील ८०० फूट खोल दरीत कोसळली होती. या दुर्घटनेत २९ जणांचा मृत्यू झाला होता. तर या अपघातातून प्रकाश सावंत देसाई हे एकमेव आश्चर्यकारक बचावले होते.
दोन महिन्यांच्या प्रतिक्षेनंतर अखेर ही बस ६ आॅक्टोबर रोजी दरीतून बाहेर काढण्यात आली. सकाळी 7 वाजल्यापासून महाबळेश्वर ट्रेकर्सच्याच्या मदतीने बस काढण्याची मोहीम हाती घेण्यात आली होती. तब्बल 7 तासाच्या अथक प्रयत्नानंतर क्रेनच्या साहाय्याने बस काढण्यात आली. बस दरीत अडकल्यामुळे पोलिसांचा तपास पूर्ण होत नव्हता. तसंच एस टी परिवहन खात्याचा तपास अपूर्ण राहिला होता.
अपघातग्रस्त बसच्या गिअर आणि स्टेरींगवर ठसे सापडले तर नेमकं कोण बस चालवत होतं याचा शोध लागला असता असा तपास यंत्रणेला कयास होता. पण सव्वा दोन महिन्याच्या प्रतिक्षेनंतर तपास यंत्रणेच्या हाती काहीच लागले नाही.
#AmritsarTrainAccident : 61 जणांचा मृत्यू घेणाऱ्या त्या रेल्वेचा आणखी एक धक्कादायक VIDEO आला समोर