लढत विधानसभेची : आंबेगावमध्ये वळसे पाटील VS आढळराव पाटील सामना

लढत विधानसभेची : आंबेगावमध्ये वळसे पाटील VS आढळराव पाटील सामना

2014 च्या लोकसभा निवडणुकीत दिलीप वळसे पाटील यांचं राजकारण आणि अमोल कोल्हेचा प्रभाव यामुळे आंबेगाव विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीला आघाडी मिळाली होती. त्यामुळे शिवाजीराव आढळराव यांच्यापुढे विधानसभेतही आव्हान असणार आहे.

  • Share this:

आंबेगाव, 18 सप्टेंबर : आंबेगाव विधानसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादीचे बडे नेते दिलीप वळसे पाटील यांच्यामुळे ओळखला जातो. 1990 पासून ते आतापर्यंत दिलीप वळसे पाटील हेच इथले आमदार आहेत. आता ही विजयी परंपरा कायम ठेवण्याचं आव्हान त्यांच्यासमोर आहे.

या लोकसभा निवडणुकीत दिलीप वळसे पाटलांनी शिरुरचे 3 वेळा खासदार झालेल्या शिवाजीराव आढळराव पाटील यांचा विजयरथ रोखला आणि अमोल कोल्हे राष्ट्रवादीचे खासदार झाले. आता शिवाजीराव आढळराव पाटील लोकसभेत विस्कटलेली राजकीय समीकरणं पुन्हा जुळवण्यासाठी तयार झालेत. दिलीप वळसे पाटील यांच्याविरोधात आढळराव स्वत: उभे राहू शकतात किंवा त्यांच्या कुटुंबातल्या कुणालातरी उमेदवारी दिली जाऊ शकते.

दिलीप वळसे पाटील आंबेगावमधून सातव्यांदा निवडणूक लढवणार आहेत. त्यांच्याविरुद्ध शिवाजीराव आढळराव यांच्या पत्नी कल्पना किंवा मुलगा अक्षय हे निवडणूक लढवू शकतात. त्यामुळे इथली लढत शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी अशीच आहे.

दिलीप वळसे पाटील यांची प्रतिष्ठा पणाला

भीमाशंकरचं तीर्थक्षेत्र आणि अभयारण्य, वेगाने वाढणारं मंचर शहर आणि डोंगर कोसळून दुर्घटना घडलेलं माळीण गाव याच मतदारसंघात आहे. शेतकरी आणि आदिवासींची संख्या इथे लक्षणीय आहे. हे मतदार आता पुन्हा एकदा दिलीप वळसे पाटील यांना निवडून देतात की त्यांचा विजयरथ रोखून शिवसेनेला पसंती देतात ते पाहावं लागेल.

महाराष्ट्राचा महासंग्राम : परळीमध्ये भावा-बहिणीच्या लढतीकडे राज्याचं लक्ष

2014 च्या लोकसभा निवडणुकीत दिलीप वळसे पाटील यांचं राजकारण आणि अमोल कोल्हेचा प्रभाव यामुळे आंबेगाव विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीला आघाडी मिळाली होती. त्यामुळे शिवाजीराव आढळराव यांच्यापुढे विधानसभेतही आव्हान असणार आहे.

2014 विधानसभा निवडणुकीत झालेलं मतदान

दिलीप वळसे-पाटील, राष्ट्रवादी 1 लाख 20 हजार 235

अरुण गिरे, शिवसेना - 62 हजार 081

===================================================================================

SPECIAL REPORT: नारायण राणे यांच्या भाजप प्रवेशानंतर युती तुटणार का?

First published: September 18, 2019, 9:24 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading