अंबरनाथमध्ये ४० रुपयांसाठी रिक्षाचालकाचा प्रवाशावर चाकू हल्ला

अंबरनाथमध्ये ४० रुपयांसाठी रिक्षाचालकाचा प्रवाशावर चाकू हल्ला

  • Share this:

ठाणे, 20 एप्रिल : अंबरनाथमध्ये ४० रुपयांसाठी एका रिक्षा चालकानं  प्रवाशावर चाकू हल्ल्याची धक्कादायक घटना घडलीये. या हल्ल्यात प्रवासी परिराम पासवान गंभीर झाले आहे. त्यांना महापालिका रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.

हरिराम पासवान यांनी रिक्षाचं ठरलेलं भाडं ६० रुपये देण्यासाठी रिक्षाचालकाकडे १०० रुपयांची नोट दिली. पण मुजोर रिक्षाचलकानं ४० रुपये देण्यास नकार दिला. त्यामुळे त्यांच्यात बाचाबाची झाली. आणि रिक्षाचालकानं आपल्या दोन साथीदारांच्या मदतीनं हरिराम यांच्यावर चाकूने हल्ला केला.

अत्यवस्थ हरिराम पासवान यांच्यावर कळव्याच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत.

दरम्यान, अंबरनाथमधील शिवाजीनगर पोलिसांनी आरोपी रिक्षाचालक आणि त्याच्या दोन साथीदारांना अटक केलीय.

First Published: Apr 20, 2018 08:36 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading