धक्कादायक! अडीच वर्षाच्या चिमुरड्याचं अपहरण करून 70 हजारांत विकलं, नंतर असं फुटलं बिंग

धक्कादायक! अडीच वर्षाच्या चिमुरड्याचं अपहरण करून 70 हजारांत विकलं, नंतर असं फुटलं बिंग

आश्चर्याची बाब म्हणजे पोलिस स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या वस्तीत दिवसाढवळ्या घडली ही घटना

  • Share this:

उल्हासनगर, 25 सप्टेंबर: अडीच वर्षाच्या चिमुरड्याचं अपहरण करून त्याला 70 हजार रुपयांत विकल्याचा धक्कादायर प्रकार अंबरनाथमध्ये उडकीस आला आहे. आश्चर्याची बाब म्हणजे अंबरनाथ पोलिस स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या वस्तीत दिवसाढवळ्या ही घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी तीन महिलांसह पाच जणांच्या टोळीला अटक केली आहे.

हेही वाचा...वारकरी संप्रदायावर शोककळा! रामदास जाधव कैकाडी महाराजांचं कोरोनामुळे निधन

मिळालेली माहिती अशी की, अंबरनाथ पश्चिमेच्या सर्कस मैदान या झोपडपट्टीत भागात राहणाऱ्या विकास मंडल या अडीच वर्षाच्या चिमुरड्याचं अपहरण झालं होतं. तो घराच्या अंगणात खेळत असताना 15 सप्टेंबर रोजी दुपारच्या सुमारास माया काळे या महिलेने विकासला उचलून नेलं होतं. उल्हासनगर कॅम्प 4 च्या भरत नगर येथे राहणाऱ्या पूजा शेट्टीयार या महिलेला आरोपी मायानं आपल्या साथीदारांच्या मदतीने 70 हजार रुपयांत विकासला विकलं होतं.

पूजाला मुलं हवं होतं म्हणून तिनं काही दिवसांपूर्वी जयनबी खान या महिलेला सांगितले होते. जयनबी हिच्या सांगण्यावरून माया काळे या महिलेने खेळत असलेल्या विकासचे अपहरण केलं आणि शेरू सरोज याच्यामार्फत पूजाला हे 70 हजारांत विकले. दरम्यान, खेळत असलेला विकास कुठे गेला याचा त्याच्या कुटूंबीयांना खूप शोध घेतला. मात्र, विकास कुठेही सापडला नाही. विकासच्या आई लिलिया मंडल यांनी अंबरनाथ पोलीस स्टोशन मुलगा बेपत्ता असल्याची तक्रार दिली होती.

विकास उल्हासनगरात असल्याचं समजताच...

पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. अंबरनाथ पोलिसांच्या पथकाला हे मूल उल्हासनगरात असल्याचे रिक्षा वाल्यांच्या चर्चेतून समजले. याच दरम्यान अपहरण झालेल्या विकासचा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. त्यामुळे पूजा या महिलेने विकत घेतलेल्या मुलाला विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात नेऊन दिल्याची माहिती मिळली. हे मूल आपल्या दारात कोणीतरी सोडून गेल्याचा बनाव पूजा हिनं पोलिसांसमोर केला होता. अंबरनाथ पोलिसांना अपहरण झालेला मुलगा हा विठ्ठलवाडी पोलिसाकडे असल्याचे समजले. त्यांनी मुलाला आणि आरोप पूजाला ताब्यात घेत कसून चौकशी केली असता अपहरणाचा हा सगळा डाव समोर आल्याचं सहाय्यक पोलीस आयुक्त विनायक नरळे यांनी सांगितलं.

हेही वाचा...शरद पवार यांच्या एक दिवसाच्या अन्नत्याग आंदोलनावर भाजप नेत्याची सडकून टीका

पोलिसांनी या प्रकरणी पूजा शेट्टीयार, जयनबी खान, माया काळे, या तीन महिलांसह शेरू सरोज, मुकेश खारवा या दोघांना अटक केली आहे. सर्व आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी मिळाली असून या आधी टोळीनं आणखी गुन्हे केले आहेत का? याच पोलीस शोध घेत आहेत. मात्र, पोलीस स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर आलेल्या भागातून दिवसाढवळ्या एका चिमुरड्याचं अपहरण झाल्यानं पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित होत आहेत.

Published by: Sandip Parolekar
First published: September 25, 2020, 7:18 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading