मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

अंबानी कुटुंबाला धमकी देणारा ज्वेलर, दक्षिण मुंबईमध्ये दुकान

अंबानी कुटुंबाला धमकी देणारा ज्वेलर, दक्षिण मुंबईमध्ये दुकान

प्रसिद्ध उद्योगपती आणि रिलायन्स उद्योग समुहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांना आणि कुटुंबीयांना जीव मारण्याची धमकी देण्यात आल्यामुळे खळबळ उडाली होती. याप्रकरणी आता नवी माहिती समोर येत आहे.

    मुंबई, 15 ऑगस्ट : प्रसिद्ध उद्योगपती आणि रिलायन्स उद्योग समुहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांना आणि कुटुंबीयांना जीव मारण्याची धमकी देण्यात आल्यामुळे खळबळ उडाली होती. याप्रकरणी आता नवी माहिती समोर येत आहे. पोलिसांनी संशयित बिष्णू विदू भौमिक याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. डीबी मार्ग पोलीस ठाण्यात उपायुक्त निलोत्पल यांनी याप्रकरणी चौकशी केली आहे. अंबानी कुटुंबाला धमकी देणारा मानसिक रुग्ण आहे, यापूर्वीही त्याने अशा प्रकारचं कृत्य केल्याचं पोलीस रेकॉर्डमध्ये आहे. आयपीसी कलम 506 पार्ट 2 नुसार बिष्णू विदू भौमिक याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बिष्णू विदू भौमिक हा व्यवसायाने ज्वेलर आहे, त्याचं दक्षिण मुंबईमध्ये दुकान आहे. भौमिक याचं वय 50 च्या आसपास असल्याचं सांगण्यात येत आहे. भौमिक याने स्वत:च्या मोबाईलवरून 8 फोन केले, त्याने केलेल्या कॉलमध्ये मुकेश अंबानी यांच्या नावाने धमकी दिली. अंबानी कुटुंबाचा त्याने धमकीमध्ये उल्लेख केला नाही, असंही तपासात समोर आलं आहे. बिष्णू विदू भौमिक याची आता मेडिकल टेस्ट करण्यात येणार आहे आणि उद्या त्याला कोर्टात हजर करण्यात येईल. दरम्यान केंद्रीय आणि राज्यातील प्रमुख तपास यंत्रणांनी या प्रकरणाची माहिती घेतली आहे. अफझल या नावाने बिष्णूने फोन केला होता, त्याने केलेल्या 9 कॉलमध्ये धीरूभाई अंबानी यांच्याही नावाचा उल्लेख केला होता. पब्लिक पोर्टलवरून त्याने हरकीसनदास हॉस्पिटलचा नंबर त्याने मिळवला होता. 'आम्ही हॉस्पिटलमध्ये ध्वजारोहण समारंभाची सांगता करत असताना, त्याच कॉलरचे 8 ते 9 कॉल्स आले ज्यात सकाळी 10.45 ते दुपारी 12.00 पर्यंत आमच्या चेअरमनला धमकी दिली. त्यानंतर लगेचच, मुंबई पोलिसांना सतर्क करण्यात आले, एफआयआर दाखल करण्यात येत आहे आणि कॉलरचे अधिक तपशील समजून घेण्यासाठी टीमने तपास सुरू केला आहे'. एचएन रिलायन्स हॉस्पिटलचे सीईओ डॉ तरंग ग्यानचंदानी यांनी ही माहिती दिली.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: Mukesh ambani

    पुढील बातम्या