मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

'मुख्यमंत्र्यांच्या औरंगाबदमधील सभेत येण्यासाठी लोकांना पैसे वाटलेत, कारण..'; अंबादास दानवेंचा खळबळजनक आरोप

'मुख्यमंत्र्यांच्या औरंगाबदमधील सभेत येण्यासाठी लोकांना पैसे वाटलेत, कारण..'; अंबादास दानवेंचा खळबळजनक आरोप

अंबादास दानवे म्हणाले, की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांची 12 तारखेला संभाजीनगरला सभा आहे. या सभेला प्रतिसाद मिळणार नाही, हे माहिती असल्याने संदीपान भुमरे यांनी सरकारी कर्मचाऱ्यांना कामाला लावलं आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई 11 सप्टेंबर : विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे. 12 सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पैठण येथे जाहीर सभा होत आहे. मुख्यमंत्र्याच्या सभेला भरघोस गर्दी व्हावी म्हणून पैसे देऊन सभेसाठी नागरिक जमवण्याचे आदेश देण्यात आले असल्याचा आरोप अंबादास दानवे यांनी मुंबईत पत्रकार परिषदेत बोलताना केला.

कोर्टात वाद आणि मुख्यमंत्री थेट सरन्यायाधीशांसोबत एकाच व्यासपीठावर, जयंत पाटील म्हणाले...

अंबादास दानवे म्हणाले, की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची 12 तारखेला संभाजीनगरला सभा आहे. या सभेला प्रतिसाद मिळणार नाही, हे माहिती असल्याने संदीपान भुमरे यांनी सरकारी कर्मचाऱ्यांना कामाला लावलं आहे. या सभेच्या अनुषंगाने 42 गावच्या अंगणवाडी सेविकांना येण्याचे शासकीय आदेश देण्यात आले आहेत, असंही ते म्हणाले.

सरकारी यंत्रणेचा हा दुरुपयोग असून या सभेचं रेटकार्ड प्रसिद्ध झालं असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. रेटकार्ड म्हणजे सभेला हजर राहाण्यासाठी दीड हजार रुपये दिले जात असल्याचं ते म्हणाले.

अंबादास दानवे यांनी यावेळी नवनीत राणांवरही टीका केली. अमरावतीतील कथित लव्ह जिहाद प्रकरणावरुन त्यांनी नवनीत राणांना सवाल केला की तुम्ही दंगली माजवण्याचा कट रचताय का? ती मुलगी स्वतः रागाच्या भरात गेल्याचं तिने पोलिसांना सांगितलं आहे. त्यामुळे राणा फक्त समाजात तेढ निर्माण करण्याचं काम करत आहेत. हिंदुत्व शिकवतात हे पण यांना गणेश विसर्जन कसं करायचं याचंही नॉलेज नाही, असं दानवे म्हणाले.

शरद पवार विरुद्ध फडणवीस पुन्हा रंगणार सामना? मिलिंद नार्वेकरही शर्यतीत

दरम्यान शिवसेना आणि शिंदे गटामध्ये न्यायालयीन लढाई सुरू आहे. असं असताना सरन्यायाधीश उदय लळीत आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे एकाच व्यासपीठावर आले होते. यावरही दानवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. न्यायव्यवस्थेसाठी काही प्रोटोकॉल असतात, तसेच सरन्यायाधीशांसाठीही आहेत. ते त्यांनी पाळायला हवे. जयंत पाटील यांच्या मताशी मी सहमत आहे, असं अंबादास दानवे म्हणाले.

First published:

Tags: Cm eknath shinde, Maharashtra political news