बापरे! खासदार नवनीत राणा यांच्या घरात घुसला कोरोना, सासऱ्यांचा रिपोर्ट आला पॉझिटिव्ह

बापरे! खासदार नवनीत राणा यांच्या घरात घुसला कोरोना, सासऱ्यांचा रिपोर्ट आला पॉझिटिव्ह

  • Share this:

अमरावती, 2 ऑगस्ट: बडनेरा विधानसभा मतदार संघाचे आमदार रवी राणा यांचे वडील व खासदार नवनीत राणा यांचे सासरे गंगाधर राणा यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. या पार्श्वभूमीवर राणा यांच्या कुटुंबातील सर्व सदस्य व कार्यकर्ते अशा जवळपास 50 ते 60 जणाची कोरोना चाचणी घेण्यात येत आहे. आमदार रवी राणा यांच्या घराचा संपूर्ण परिसर सॅनिटाईज करण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य विभागाच्या सूत्रांनी दिली आहे.

दरम्यान, संपूर्ण राज्यात कोरोनाचा कहर सुरूच आहे. मुंबई, पुणेपाठोपाठ आता कोरोनाचं संकट ग्रामीण भागात जास्त गडद होताना दिसत आहे.

हेही वाचा...मोठी बातमी! मुंबई महापौर किशोरी पेडणेकर यांच्या थोरल्या भावाचा कोरोनामुळे मृत्यू

या आधी रवी राणा आणि नवनीत राणा यांचीही कोरोना चाचणी घेण्यात आली होती. मात्र, राणा दाम्पत्यांचं चुकीचे थ्रोट सॅम्पल घेतल्याने मोठा गोंधळ उडाला होता. अमरावती जिल्हा प्रशासन आरोग्य विभागाच्या हलगर्जीपणाबाबत आमदार रवी राणा यांनी थेट राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचेकडे तक्रार केली होती.

काय आहे हे प्रकरण...?

आमदार रवी राणा यांनी ताप आल्याने दोन दिवसांपूर्वी अमरावतीच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. खबरदारीचा उपाय म्हणून आमदार रवी राणा व खासदार नवनीत राणा यांचे थ्रोट स्वॅब जिल्हा कोविड रूग्णालयाच्या टीम मार्फत घेण्यात आले होते. हे स्वॅब तपासणीसाठी नागपूर येथील AIIMS मध्ये पाठवण्यात आले होते. मात्र, स्वॅब सॅम्पल चुकीचे असल्याचे AIIMS तज्ज्ञ डॉ. मीना यांनी खासदार नवनीत राणा यांना फोन करून माहिती दिली होती. तसेच त्यांचे सॅम्पल परत पाठवण्यास सांगितले होते. यापूर्वीही 40 ते 45 स्वॅब हे चुकीच्या पद्धतीने घेतल्याने ते नागपूर येथील AIIMS ने रिजेक्ट केले.

आमदार रवी राणा यांनी आता याबाबत राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे तक्रार केली आहे. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम हे महत्त्वाच्या कामात हलगर्जीपणा करतात तर जिल्हाधिकारी केबिनच्या बाहेर निघत नसल्याची तक्रारीत म्हटलं होतं.

आमदार रवी राणा हे 2 दिवसांपासून रेडियांट हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. खबरदारी तसेच जनतेत संभ्रम निर्माण होऊ नये म्हणून त्यांनी स्वतः जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम यांच्याकडे जाऊन आपले थ्रोट स्वॅब तपासणी करण्याचे सुचवले. यानुसार शल्य चिकित्सकांनी त्यांच्याकडे कोविड रुग्णालयाची टीम पाठवून आमदार रवी राणा तसेच त्यांची पत्नी आणि खासदार नवनीत राणा यांचे थ्रोट स्वॅब सॅम्पल घेतले. सदर सॅम्पल हे नागपूर AIIMS येथे पाठवण्यात आले. परंतु AIIMS तपासणी प्रमुख डॉक्टर मीना यांनी भ्रमध्वनीद्वारे सदर सॅम्पल चुकीचे असून पुन्हा सॅम्पल पाठवण्याचे खासदार नवनीत रवी राणा यांना सांगितले होते.

हेही वाचा...मास्क आणि सॅनिटायजर किमतीच्या नियंत्रणासाठीची सरकारने उचललं पाऊल

भोंगळ कारभारावर शल्य चिकित्सक डॉ.श्यामसुंदर निकम यांना विचारले असता त्यांनी चुकीवर पांघरून घालून पुन्हा थ्रोट स्वॅब सॅम्पल घेण्यासाठी टीम पाठवीत असल्याचं सांगितलं. या संतापजनक प्रकारामुळे कोरोनाविषयी जिल्हा प्रशासन किती गंभीर आहेत, हे दिसत आहे. याप्रकरणी खासदार नवनीत राणा यांनी जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. निकम यांची चांगलीच खरडपट्टी काढली होती.

Published by: Sandip Parolekar
First published: August 2, 2020, 4:49 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading