यशोमती ठाकूर यांच्याविरुद्ध आक्षेपार्ह पोस्ट करणारा 'तो' अधिकारी अखेर निलंबित

यशोमती ठाकूर यांच्याविरुद्ध आक्षेपार्ह पोस्ट करणारा 'तो' अधिकारी अखेर निलंबित

मंत्र्याविरोधात खुलेआम सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करणं शासकीय अधिकाऱ्याला भोवलं

  • Share this:

अमरावती, 31 ऑक्टोबर: राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री आणि अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर (Minister Yashomati Thakur) यांच्या विरोधात सोशल मीडियावर (Social Media) आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या शासकीय अधिकाऱ्यावर अखेर निलंबणाची कारवाई करण्यात आली आहे.

अमरावती जिल्ह्यातील धारणी येथील कृषी विभागातील पर्यवेक्षक अरुण कुमार बेठेकर यांनी 27 ऑक्टोबर रोजी मंत्री यशोमती ठाकूर यांच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट केली होती. ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली होती.

हेही वाचा...'बिहार निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सरकार पडेल, शिवसेना विरोधी पक्षात बसेल'

मंत्र्याविरोधात खळबळ उडवून देणारी पोस्ट व्हायरल केल्याने युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पंकज मोरे यांनी धारणीसह राजापेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. यात अखेर विभागीय कृषी पर्यवेक्षक यांनी अरुण बेठेकर यांचे निलंबनाचे आदेश काढले आहे.

अमरावती येथील आदिवासी जात प्रमाणपत्र का कार्यालयात गोवारी समाजाचे आंदोलन होते. या आंदोलनाला यशोमती ठाकूर यांनी भेट दिली. होती. यामुळे अरुण बेठेकर यांनी खऱ्या आदिवासी वर अन्याय व बोगस लोकांना यशोमती ठाकूर साथ देत आहेत. त्यामुळे त्यांची हकालपट्टी करण्यात यावी, अशी आक्षेपार्ह पोस्ट अरुण बेठेकर यांनी केली होती.

कृषी पर्यवेक्षक पदावरील अधिकाऱ्यानं यशोमती ठाकूर यांची बदनामी केली होती. या प्रकरणी धारणी पोलीस ठाण्यात अरुण बेठेकरविरुद्ध भादंवी 500 प्रमाणे धारणी पोलिसांत गुन्हा सुद्धा दाखल झाला होता.

त्यानंतर आता अमरावती विभागाचे कृषी सहसंचालक सुभाष नागरे यांनी शासकीय नियमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी कृषी पर्यवेक्षक अरुण बेठेकर यांच्या निलंबनाचे आदेश काढले. एका मंत्र्याविरोधात खुलेआम सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करणे या शासकीय अधिकारी कर्मचाऱ्याला चांगलंच भोवलं आहे.

यशोमती ठाकूर यांच्या राजीनाम्यासाठी भाजपचं आंदोलन

दुसरीकडे, अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांना 2012 च्या पोलीस कर्मचारी मारहाण प्रकरणी अमरावती जिल्हा सत्र न्यायालयाने 3 महिन्याची शिक्षा सुनावली होती. त्यामुळे न्यायालयाने दोषी ठरविलेल्या यशोमती ठाकूर यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून त्यांनी आमदारकी व मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी अमरावती जिल्हा भाजपने केली आहे.  या मागणीसाठी अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे देत यशोमती ठाकूर यांच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या.

हेही वाचा..संजय राऊतांना इतरांनी केलेली टीका लगेच टोचते, चंद्रकांत पाटलांचा सेनेवर पलटवार

कर्तव्यावर हजर असलेल्या पोलिसांना मारहाण करणे चुकीचे आहे. त्यामुळे न्यायालयाने दोषी ठरवून सुद्धा यशोमती ठाकूर यांनी राजीनामा दिला नाही. त्यामुळे त्यांनी जणाची नाही तर मनाची लाज ठेवावी, असा आरोप भाजप महापौर चेतन गावंडे यांनी यावेळी केला आहे.

Published by: Sandip Parolekar
First published: October 31, 2020, 5:51 PM IST

ताज्या बातम्या