मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /बिकट परिस्थितीतही मजुराचा प्रामाणिकपणा, नाल्यात सापडलेले 97 हजार पोलिसांकडे केले सुपूर्द

बिकट परिस्थितीतही मजुराचा प्रामाणिकपणा, नाल्यात सापडलेले 97 हजार पोलिसांकडे केले सुपूर्द

कोरोना काळात (Coronavirus Pandemic) अनेकजण स्वत:ची पोळी कशी भाजता येईल याचा विचार करत आहेत. या काळात सामान्य माणूस मात्र वेळोवेळी प्रामाणिकपणाचा प्रत्यय देत आहे. माणुसकीचा आणि प्रामाणिकतेचा प्रत्यय देणारी अशीच एक घटना अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यात समोर आली आहे.

पुढे वाचा ...

अमरावती, 25 एप्रिल: कोरोना काळात (Coronavirus Pandemic) अनेकजण स्वत:ची पोळी कशी भाजता येईल याचा विचार करत आहेत. या काळात सामान्य माणूस मात्र वेळोवेळी प्रामाणिकपणाचा प्रत्यय देत आहे. माणुसकीचा आणि प्रामाणिकतेचा प्रत्यय देणारी अशीच एक घटना अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यात समोर आली आहे. शासनाच्या रोजगार हमी योजनेत काम करणाऱ्या मजुराने 97 हजारांच्या पाचशे रुपयांच्या नोटांचे बंडल पोलीस स्टेशनमध्ये नेऊन दिले आहे. रामदास जिचकार असं या मजुराचं नाव आहे.

अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यातील दापोरी येथील रामदास गोमाजी जिचकार हे सामाजिक वनीकरणाच्या कामावर रोजंदारीवर मोलमजुरी करतात. कोरोना काळात परिस्थिती अशी आहे की कधी त्यांना मजुरी मिळते कधी नाही. घरात मुलांचे शिक्षण, मुलीचे लग्न अशा एक ना अनेक समस्या रामदास यांच्यापुढे उभ्या आहेत. अशातच आज सकाळी दापोरी ते मायवाडी रस्त्यावरील झाडांना पाणी टाकण्याकरता लगतच्या नाल्यांमध्ये पाणी आणण्याकरता गेले होते. त्यावेळी त्यांना त्या पाण्यामध्ये पाचशेच्या नोटांचे बंडल चिखलामध्ये पडून असल्याचे आढळून आले. पाचशे रुपयाच्या एवढ्या मोठ्या नोटा पाहून आणि घरच्या अडीअडचणी पाहून कुणाच्याही  मनात स्वार्थ निर्माण होणे साहजिकच होते. पण मोलमजुरी करणाऱ्या रामदास यांच्यातील प्रामाणिकपणा याठिकाणी वरचढ ठरला.

(हे वाचा-‘सामान्य लोकांना देखील वेळ द्या’; सेलिब्रिटींना भेटणारे आरोग्यमंत्री झाले ट्रोल)

रामदस जिचकार यांनी सामाजिक वनीकरणचे वनपाल काळे यांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर नोटाचे बंडल घेऊन रामदास यांनी मोर्शी पोलीस स्टेशन गाठले आणि घडलेला प्रकार सांगून त्या नोटा पोलिसांत जमा केल्या. यामुळे मोल मजुरी करणाऱ्या रामदास यांनी दाखवलेल्या  प्रामाणिकते मुळे मोर्शी पोलिसांनी त्यांचा सत्कार केला आहे. सध्या कोरोनाच्या काळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, रोजंदारीवर काम करणाऱ्या मजुरांना रोजगार मिळणे कठीण झाले. काही भागात तर तरुणांनी पोटाची भूक भागवण्यासाठी किराणा दुकाने फोडणे सुरू केले आहे. मात्र अशाही परिस्थितीत घरात अनेक आर्थिक समस्या असल्या तरीही कुठल्याही  प्रलोभनाला बळी न पडता रामदास यांनी दाखवलेल्या प्रामाणिकपणाचे कौतुक. सर्वच स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे.

First published:

Tags: Corona, Corona hotspot, Corona spread