MLC Election Results 2020 :अमरावतीमध्ये भाजपला जबर धक्का, अपक्ष उमेदवाराची महाविकास आघाडीला टक्कर

MLC Election Results 2020 :अमरावतीमध्ये भाजपला जबर धक्का, अपक्ष उमेदवाराची महाविकास आघाडीला टक्कर

  • Share this:

अमरावती, 3 डिसेंबर: धुळे-नंदुरबारमध्ये भाजपच्या अमरीश पटेलांनी दणदणीत विजय मिळवला आहे. मात्र, अमरावती विभाग विधानपरिषद शिक्षक मतदारसंघात भाजपला जबर धक्का बसला आहे.

पहिल्या फेरीत भाजपचे नितीन धांडे पिछाडीवर गेले आहेत. तर अपक्ष उमेदवार किरण सरनाईक 3131 मतांसह आघडीवर आहेत. तर महाविकास आघाडीचे श्रीकांत देशपांडे यांना 2300 आणि शिक्षक आघाडीचे शेखर भोयर यांना 2078 मत मिळवली आहेत.

पुणे, औरंगाबाद, नागपूर या पदवीधर आणि पुणे, अमरावती शिक्षक मतदारसंघ आणि धुळे-नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्था मतरादरसंघात 1 डिसेंबरला मतदान झालं. गुरुवारी या निवडणुकांची मतमोजणी होत आहे.

हेही वाचा...औरंगाबादेत तणाव! तरुणीवरून झालेल्या वादातून दोन गटात फ्री स्टाईल, VIDEO आला समोर

पहिली फेरी

14 टेबलवर 14 हजार मतमोजणी

- वाशीम येथील किरण सरनाईक 831 मतांनी आघाडीवर (3131)

- महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीकांत देशपांडे दुसऱ्या क्रमांकावर(2300)

- अपक्ष उमेदवार शेखर भोयर तिसऱ्या क्रमांकावर(2078)

- अपक्ष उमेदवार संगीता शिंदे चवथ्या क्रमांकावर(1304)

- भाजप उमेदवार नितीन धांडे सातव्या क्रमांकावर ( 666)

वैध मते- 13511

अवैध मते- 488

पहिल्या फेरीअखेर 13999 मतांची मोजणी पूर्ण

अमरावती : शिक्षक मतदारसंघ निवडणूक, पहिल्या फेरीचा निकाल

पहिल्या फेरीत वैध 13 हजार 999 मतांपैकी 488 अवैध तर 13 हजार 511 मते वैध ठरली.

या फेरीतील मते अशी : डॉ. नितीन धांडे- 666, श्रीकांत देशपांडे –2300, अनिल काळे – 12, दिलीप निंभोरकर- 151, अभिजित देशमुख – 9, अरविंद तट्टे- 13, अविनाश बोर्डे- 1174, आलम तनवीर- 9, संजय आसोले- 30, उपेंद्र पाटील- 21, प्रकाश कालबांडे- 437, सतीश काळे-78, निलेश गावंडे- 1183, महेश डावरे-141, दिपंकर तेलगोटे-6, डॉ. प्रवीण विधळे-7, राजकुमार बोनकिले-348, शेखर भोयर- 2078, डॉ. मुश्ताक अहमद- 8, विनोद मेश्राम – 7, मो. शकील- 14, शरद हिंगे- 25, श्रीकृष्ण ठाकरे- 10, किरण सरनाईक –3131, विकास सावरकर – 314, सुनील पवार- 35, संगीता शिंदे- 1304.

हेही वाचा...भाजपच्या जोरदार संघटनात्मक हालचाली सुरु, सरकारबाबत प्रभारींनी मांडलं भाकीत

शिक्षक मतदारसंघात मतदानाची टक्केवारी अधिक

अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघात 82.91 टक्के मतदान झालं. मतदानासाठी अनेक ठिकाणी रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळालं होतं. अमरावतीमध्ये एकूण 35622 मतदार आहेत. त्यापैकी सर्वाधिक मतदार अमरावतीमध्ये आहेत. अमरावतीमध्ये प्रमुख लढत महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीकांत देशपांडे आणि भाजपचे नितीन धांडे यांच्यामध्ये होत आहे.

Published by: Sandip Parolekar
First published: December 3, 2020, 4:53 PM IST
Tags:

ताज्या बातम्या